सत्यता जाणून घेऊया लातूर जिल्ह्यात कोरूना विषाणूचा संशयित रुग्ण ?
जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून प्रशासनाकडून सर्व प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात आलेल्या असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले असून अफवा पसरविण्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे निर्देश ही दिलेले आहेत.
लातूर:(प्रतिनिधी) जिल्ह्यातल्या मसला (ता. लातूर) येथे कोरोना विषाणूचा संशयित रुग्ण असल्याची चर्चा परिसरातील गावागावांमध्ये गुरुवारी (ता. ५) सकाळपासून सुरू झाली. सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावरही बातमी आली. संबंधित संशयित रुग्णाचा फोटोही झळकला. आणि जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले.वैद्यकीय पथक सकाळीच मसला गावात दाखल झाले.आरोग्य अधिकारी,पोलिस अधिकारी,मसला गावात दाखल झाले होते. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच बसलिंग वांगस्कर, उपसरपंच, ग्रामसेवक योगेश लातूरकर, मुरूड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक एम. बी. गोमारे,वैद्यकीय अधिकारी एस.के. नागापुरे आदींनी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला.आख्खा गाव पिंजून काढला.पण अज्ञात व्यक्तीने बनावट फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे उघड झाले.या खोडसाळपणामुळे सगळा गावच काही काळ चिंतेत पडला होता.गावातच नव्हे तर जिल्ह्यातसुद्धा संशयित रुग्ण नसून कोणीतरी हा खोडसाळपणा केल्याचे निष्पन्न झाले, तेव्हा सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.अफवा पसरवू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका,अफवा पसरविणाऱ्या व्यक्तीची गय केली जाणार नसून कडक कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत यावेळी सहायक पोलिस निरीक्षक गोमारे यांनी दिले.यावेळी प्रमोद धुमाळ,महेश धुमाळ,रत्नलिंग धुमाळ,राम ऐतवाड, नवनाथ निलंगे,सुभाष धुमाळ, उमाकांत वांगस्कर,बंटी वांगस्कर, सतीश धुमाळ, हणमंत राजमाने, अंजनकुमार स्वामी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments