उस्मानाबाद लाचलुचपत विभागाच्या उपअधीक्षक संपते
उस्मानाबाद:(प्रतिनिधी) येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक पदी प्रशांत पांडुरंग संपते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशांत संपते यांची नांदेड येथून उस्मानाबाद येथे बदली करण्यात आली आहे राज्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक अजय आफळे यांनी सोमवारी दिनांक तीन पोलिस उपाअधीक्षकांच्या बदलीचे आदेश जारी केले. यामध्ये औरंगाबाद येथील संजय उदयसिंग घाटगे यांची सांगली प्रशांत पांडुरंग संपते यांची नांदेड येथून उस्मानाबाद तर संजय मनोहर पाटील यांची बृहन्मुंबई येथून सोलापूर येथे नियुक्ती केली आहे. त्यांना तातडीने रुजू होऊन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे.
0 Comments