Latest News

6/recent/ticker-posts

भाजपाची सत्ता असलेल्या नगरपरिषदेत ‘सीएए’, ‘एनआरसी’ विरोधी ठराव मंजूर

भाजपाची सत्ता असलेल्या नगरपरिषदेत ‘सीएए’, ‘एनआरसी’ विरोधी ठराव मंजूर


परभणी:(प्रतिनिधी) शभरात सध्या सीएए, एनआरसी व एनपीआर या मुद्यांवरून अनेक दिवासंपासून मोठे वादंग सुरू आहे. केंद्र सरकारच्या विरोधकांकडून याचा तीव्र विरोध केला जात आहे. देशभरात अनेक ठिकाणी हिंसक आंदोलनं देखील केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर एकीकडे भाजपाकडून या कायद्याबद्दल जनजागृती अभियान राबवले जात असताना, दुसरीकडे भाजपाची सत्ता असलेल्या परभणी जिल्ह्यातील सेलू नगरपरिषदेत सर्वसंमतीने सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि प्रस्तावित राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) च्या अंमलबजावणीविरोधात एकमताने ठराव मंजूर झाला. पीटीआयने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
नगरपरिषदेचे अध्यक्ष विनोद बोराडे  म्हणाले, हा प्रस्ताव २८ फेब्रुवारी रोजी कोणाचाही विरोध न होता पारीत झाला. नगरपरिषदेत २७ नगरसेवक आहेत व तीन सहस्वीकृत सदस्य आहेत.
स्थानिक लोकप्रतिनिधी या निर्णयाच्या बाजूने होते. प्रस्ताव पारीत होण्याच्या दोन दिवस अगोदर एक बैठक बोलवण्यात आली होती. ज्याची मागणी काँग्रेस, राष्ट्रवादीचे सदस्य व मुस्लीम समुदायाच्या सात नगरसेवकांकडून करण्यात आली होती. असे देखील बोराडे यांनी सांगितले आहे. नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या निर्णयामुळे आता भाजपा अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


Post a Comment

0 Comments