"विराट" राहणार लातुरात होणाऱ्या पशु प्रदर्शनातील मुख्य आकर्षण
लातूर:(सतीश तांदळे) श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या यात्रा महोत्सवानिमित्त आयोजित कृषी व पशु प्रदर्शनास आज सुरुवात होत आहे. या प्रदर्शनात लातूर तालुक्यातील शिवणी येथील अजित प्रल्हाद बोराडे यांचा विराट हा मुरा जातीचा वळू प्रमुख आकर्षण असणार आहे. विशेष म्हणजे विराट हा गतवर्षीच्या पशु प्रदर्शनातील विजेता आहे. विराटला अनेक राष्ट्रीय पशु प्रदर्शनात सन्मानित देखील करण्यात आले आहे. जवळपास १५०० किलो वजन असलेला विराट अवघ्या ४.५ साडे चार वर्षाचा आहे. लातूरच्या शिवणी गावात जन्मलेला आणि इथेच वाढलेला हा वळू राज्यातील पशु पालकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरला आहे.
0 Comments