जयप्रकाश दगडे यांना
राज्यस्तरीय 'आदर्श पत्रकार रत्न २०२० ' पुरस्कार घोषित
लातूर:(प्रतिनिधी) ज्येष्ठ पत्रकार आणि दै.पुण्यनगरीचे वरिष्ठ वृत्तसंपादक जयप्रकाश दगडे यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मैत्री फाऊंडेशनचा सन २०२० साठीचा ' आदर्श पत्रकार रत्न २०२० ' हा राज्यस्तरीय पुरस्कार काल जाहीर झाला. राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक क्षेत्रांत गेल्या दशकापासून कार्यरत असलेल्या आदर्श मैत्री फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी राज्यातील विविध नऊ क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणार्या आदर्श व्यक्तींना ' राज्यस्तरीय आदर्श नवरत्न पुरस्कारां ' नी सन्मानित करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून जयप्रकाशजींना हा पुरस्कार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष बिराजदार यांनी काल बुधवारी २६ फेब्रुवारी रोजी घोषित केला.
जयप्रकाश दगडे यांना मिळालेला पत्रकारितेतील हा ७२ वा पुरस्कार असून, यापूर्वी महाराष्ट्र शासनाने उत्कृष्ट पत्रकार म्हणून लागोपाठ तीन वेळा पुरस्कार प्रदान करून गौरविले आहे. याशिवाय त्यांना आजवर मिळालेल्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांमध्ये एमआयटी( पुणे) चा राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड राज्यस्तरीय जनजागरणरत्न पुरस्कार,भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक पत्रकारिता पुरस्कार, लोकमत वृत्तसमूहाचे उत्कृष्ट पत्रकारितेतील नऊ पुरस्कार, अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचा स्व.बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता पुरस्कार, स्व.पां.वा. गाडगीळ पुरस्कार, कै.अनंत भालेराव स्मृती पुरस्कार, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई चा पत्रकार भूषण पुरस्कार, भगवंत मित्र मंडळ पुणे यांचा जीवन गौरव पुरस्कार, चौथा स्तंभ पत्रकारिता पुरस्कार, एकता सेवाभावी संस्थेचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार , स्व. रामेश्वर बियाणी जीवन गौरव पुरस्कार (नांदेड), आविष्कार फाऊंडेशन कोल्हापूर चा स्व. बाळशास्त्री जांभेकर स्मृती पत्रकारिता पुरस्कार, दर्पण पत्रकारिता पुरस्कार(३), दक्षिण भारत जैन सभेचा आदर्श पत्रकारिता पुरस्कार, महाराष्ट्र मुक्त पत्रकार महासंघ मुंबईचा आदर्श ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी फलटण चा दर्पण पुरस्कार, रोटरी इंटरनॅशनल ( चेन्नई ) चा 'अॅवाॅर्ड फाॅर एक्सलन्स इन जर्नालिझम ' पुरस्कार,) जनप्रवाह मुंबई चा अनंत भालेराव शोधपत्रकारिता पुरस्कार, समर्थन ( मुंबई ) चा मानवी हक्क वार्ता पुरस्कार , संत मुकुंदराज पत्रकारिता पुरस्कार अंबाजोगाई , परिवर्तन पुरस्कार( बीड ), लातूर गौरव पुरस्कार आदी अनेक पुरस्कारांचा समावेश आहे.
लातूर येथे २०१८ मध्ये झालेल्या ३४ व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष, उस्मानाबाद जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या तडवळे येथील स्मृती साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष, बार्शी येथे १९८० मध्ये संपन्न झालेल्या ५४ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे सहकोषाध्यक्ष , माध्यम साहित्यिक-सांस्कृतिक विचारपीठाचे संस्थापक अध्यक्ष आदी महत्वाच्या पदांची जबाबदारीही त्यांनी समर्थपणे सांभाळली आहे.
0 Comments