Latest News

6/recent/ticker-posts

गो गर्ल गो उपक्रमांतर्गत पारडीच्या जना डिकळेची विभागावर निवड    

गो गर्ल गो उपक्रमांतर्गत पारडीच्या जना डिकळेची विभागावर निवड              


नांदेड:(क्रीडा प्रतिनिधी) जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत खेलो इंडीया,फिट इंडिया मोव्हमेंट अंतर्गत गो गर्ल गो मुलींसाठी खेळवण्यात आलेल्या १०० मी.धावणे स्पर्धेत जि.प.प्रा.शाळा पारडी ता.लोहा येथील कु.जना गणेशराव डिकळे या विद्यार्थिनीने लोहा तालुक्याचा झेंडा फडकविला व नांदेड जिल्हास्तरावर १४ वर्षाखालील मुलींमध्ये सुवर्णपदक पटकावले. जिल्ह्यातून १६ तालुक्यातील मुलींनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून मैदानावर स्वतःला झोकून दिले. पण त्यात पारडीची जना डिकळे वरचढ ठरली.
या यशाबद्दल केंद्रप्रमुख श्री बाबुराव फसमले, ज्येष्ठशिक्षण विस्ताराधिकारी श्री सर्जेराव टेकाळे, गटशिक्षणाधिकारी श्री रवींद्र सोनटक्के,सागर तापडिया,शाळेचे मुख्याध्यापक व क्रीडा मार्गदर्शक एम.एल.किसवे, डी पी बालाघाटे, सहशिक्षिका ज्योती कदम,चित्रा गंगाखेडकर,सुरेखा इंगोले रेखा कदम व सरोजिनी पांचाळ यांनी त्याचे कौतुक केले.


Post a Comment

0 Comments