Latest News

6/recent/ticker-posts

नूतन भाजपा शहरजिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे यांचा सत्कार

नूतन भाजपा शहरजिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे यांचा सत्कार 


लातूर:(प्रतिनिधी) भारतीय जनता पक्ष लातूर शहर जिल्हाध्यक्ष पदी गुरूनाथ मगे यांची निवड झाली असल्याने प्रभाग क्रमांक ६ च्या वतीने शोभाताई कोंडेकर जिल्हा सरचिटणीस महिला मोर्चा यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरूनाथ मगे यांचा शाल सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
 या प्रसंगी प्रभागातील महिला कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या मिनाताई भोसले शहराध्यक्षा भाजपा महिला मोर्चा यांचा ही सत्कार या वेळी करण्यात आला.या प्रसंगी किशोर जैन, अभिजीत माचीले, प्रथ्वीसिंह बायस, दिग्विजय काथवटे, नगर सेवीका भाग्यश्री कौळखेरे, रत्नमाला घोडके,चेतना जैन,कल्पना कुरकुट, शिलाताई कडतने व महिला मोर्चा कार्यकारिणी ची सर्व पदाधिकारी उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभाताई कोंडेकर व आभार प्रदर्शन प्रियंका कोंडेकर यांनी केले.


Post a Comment

0 Comments