Latest News

6/recent/ticker-posts

युवक-युवतींसाठी जीवन कौशल्य शिक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

युवक-युवतींसाठी जीवन कौशल्य शिक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन


लातूर:(प्रतिनिधी) महाविद्यालयीन  युवक-युवतींना महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा युवक सेवा संचालनालयाच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, लातूर द्वारा दिनांक १६ ते २५ मार्च २०२० या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल,औसा रोड,लातूर येथे निवडक १०० युवक व युवतींसाठी दहा दिवसांचे निवासी "जीवन कौशल्य शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम" प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिरामध्ये व्यक्तिमत्व विकास,नेतृत्व, स्वयंरोजगार,नेहरू युवा केंद्राच्या योजना, विविध शासकिय खात्याच्या युवक विकासाच्या योजना,करिअर गाईडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, स्पोकन इंग्लिश, क्रिएटिव व क्रिटिकल थिंकींग समस्या निवारण इत्यादी विषयावर सविस्तर प्रशिक्षण देण्यात येणार आहे.तसेच दररोज सकाळी एक तास योगा शारीरिक तंदुरुस्ती यावर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या युवकांना शासनाच्या वतीने विमा मूल्य सहभागी करण्यात येवून प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार असून शिबिरार्थीची निवास व भोजन व्यवस्थाही विनामूल्य करण्यात येणार आहे.अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,जिल्हा क्रीडा संकुल,औसा रोड,लातूर येथे संपर्क साधावा असे आव्हान जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments