Latest News

6/recent/ticker-posts

कोरोना व्हायरसची खबरदारी म्हणून सोमवार आठवडी बाजार रद्द

कोरोना व्हायरसची खबरदारी म्हणून सोमवार आठवडी बाजार रद्द


निटूर:(प्रतिनिधी) जगभरातील कोरोना व्हायरसमुळे जनता भयभीत झाली आहे.कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरिकांनी सतर्क राहावे अनावश्यक गर्दी टाळावी तसेच दि. ३१ मार्च २०२० सोमवार आठवडी बाजार रद्द  करण्यात आला आहे. व्यापारी शेतकरी परिसरातील नागरिकांनी नोंद घ्यावी असे अहवान ग्रामपंचायत कार्यालय,निटूरचे ग्राम विकास अधिकारी शाहूराज मिरकलकर, सरपंच परमेश्वर हसबे,उपसरपंच संगमेश्वर करंजे यांनी "मराठी अस्मितेचा इशारा" प्रतिनिधीशी बोलताना ही माहिती दिली आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ हा दि. १३/०३ /२०२० पासून उपरोक्त कायदा लागू करून खंड २, ३, व ४ मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केल्याने अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी आठवडी बाजार बंद राहील असे आव्हान करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments