Latest News

6/recent/ticker-posts

कोरोना महाआपतीमुळे महानगरपालिकेने मालमत्ता करासाठी मुदतवाढ द्यावी- नागरिक हक्क कृती समिती

कोरोना महाआपतीमुळे महानगरपालिकेने मालमत्ता करासाठी मुदतवाढ द्यावी- नागरिक हक्क कृती समिती


लातूर:( प्रतिनिधी) लातूर शहर महानगरपालिकेने शहरातील मालमत्ता धारकांकडून सक्तीने कर वसुलीची मोहीम राबवली जात आहे.देशातील संपूर्ण जनजीवन कोरोना  या महामारी मूळे ठप्प झाले आहे. महाराष्ट्र शासनाने जमावबंदी लागू केली आहे. शाळा, महाविद्यालये बंद आहेत.न्यायालयातील कामकाज मंदावले आहेत अनेक व्यवसाय बंद आहेत.रोजगार बंद, व्यवहार बंद, आणि कोरोनाची नागरिकातीली दहशत,बाजारपेठ ठप्प झाली आहे व्यापार नाही हाताला काम नाही आणि उलट महानगरपालिकेची सक्ती ची वसुली दुकाने,कार्यालये सील केले जात आहेत.आशा विदारक परिस्थिती महानगरपालिकेने शहरात स्वछता व नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे.जनतेला जाचक अवाजवी मालमत्ता कर वसुलीसाठी तीन महिण्याची मुदतवाढ द्यावी अशी अग्रही मागणी नागरिक हक्क कृती समितीने पालकमंत्री अमित विलासराव देशमुख,महापौर, आयुक्त यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर भाई उदय गवारे,बसवंत भरडे, दिनेश गिल्डा,अँड धनंजय चिताडे,अँड अजय कलशेट्टी,श्रीकांत देशपांडे, हेमंत जाधव, विजय चितकोटे,सुरज भोसले, विरभद्र वाले, सुरेश दोशेट्टी ,अनुप देवणीकर,शैलजा अंबेसंगे अँड भालचंद्र कवठेकर, अँड जगदीश शहाबादे,रमेश पाटील, रणधीर सुरवसे,सलीम चौधरी, शेख नयुम,अँड शांतेश्वर येरटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


Post a Comment

0 Comments