Latest News

6/recent/ticker-posts

सलग पाच दिवस देणार तीनशे कुटुंबांना भाजीपाला मोफत- जुबेर चौधरी

सलग पाच दिवस देणार तीनशे कुटुंबांना भाजीपाला मोफत- जुबेर चौधरी


निलंगा शहरांत चौधरी परिवाराच्या वतीने भिल्ल वस्ती, पारधी व मातंग वस्तीती भाजीपाला वाटप


 


निलंगा:(प्रतिनिधी) जगभर कोरोनाचे मोठे संकट ओढवले असुन केंद्र व राज्य सरकारने ही साथ थांबविण्या साठी संचारबंद लागु केली आहे. मात्र अशा अनिबाणीच्या काळात गोरगरीब जनता  जे मोल मजुरी करून आपल्या घराची चूल पेटवतात अश्या लोकांना त्रास होत असल्याने निलंगा शहरांतील भाजीपाला विक्रते जुनेद चौधरी,जाकेर चौधरी व जुबेर चौधरी.हे चौधरी परिवार यांच्या मदतीला धावून पुढे आले.अन चक्क शहरांतील सलग पाच दिवस ३oo कुटुंबियांना भाजीपाला मोफत देण्याचे सामाजिक कार्य हातात घेतले.शहरांतील पोलिस प्रशासनही व नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांनी चौधरी परिवाराच्या भरभरून कौतुक करत महणाले अश्या संकटाच्या सम्य तुम्ही सर्वजण गोरगरीब लोकांना मोफत भाजीपाला घरपोच देऊन त्यांना मदत करत आहोत हीच खरी सेवा असून शासनाच्या नियमांचे पालन तंतोतंत करत भाजीपाला देत असतांना सॅनिटायझर व मास्क चा वापर करावा आणि गरजू लोकांना भाजीपाला देत असतांना ६ फुटांचा अंतर ठेवून भाजीपाला देऊन नागरिकांना घरातच राहवून शासनाचे नियमांचे पालन करण्यासाठी जनजागृती करावी असे नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांनी चौधरी परिवारला सांगितले.या महामारीला रोखण्यासाठी बेशीस्त होऊ देणार नाही असे शब्द चौधरी परिवाराचे प्रमुख मिनाज बागवान व जुनेद बागवान यांनी प्रशासनाला दिले असून निलंगा शहरांतील सकाळी ७.०० ते ११.०० यावेळेत आज शिवाजी नगर भागातील भिल्ल वस्तीत १०० गरजू लोकांना व पारधी झोपडपट्टीत ५० गरजूंना तसेच मातंग वस्तीमध्ये १५० गोरगरीब नागरिकांना भाजीपाला मोफत मध्ये देऊन सामाजिक कार्य चौधरी परिवाराने केले. जुबेर चौधरी यांनी गोरगरीब गरजू लोकांना भाजीपाला देत असतांना जनजागृती करत म्हणाले की कोरोना सारख्या जागतीक महामरीवर नियंत्रण मिळवणे शक्य आहे.यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या सूचना व मा-जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी सांगितले आहे की आपण विनाकारण घराच्या बाहेर पडू नये.हे २१ दिवस आपल्यासाठी अतयंत महत्वाचे असून शासनाच्या नियमांचे पालन केल्यास आपण कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखू शकतो.शासन व प्रशासन आपल्या आरोग्याची काळजी घेत असून आपण स्वतःचे रक्षक म्हणूच घरीच बसावं अशी विनंती करून जनतेत सामाजिक कार्यासह जनजागृती करत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च रोजी देशात लाॅक डाऊन केले होते.त्यानंतर केंद्र व राज्य सरकारने एकवीस दिवसासाठी संचारबंदी लागू केली आहे. काही काळासाठी जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी लोकांना सूट देण्यात आली आहे.संचारबंदी व जमावबंदी होऊ नये यासाठी घरातील प्रमुख लोकांनी आपल्या घरच्या सदस्यांना घराच्या बाहेर जाण्यास रोकावे.. भाजीपाला मोफत घरोपच देत असताना अनेक गोरगरीब गरजू लोकांनी डोळ्यात पाणी भरून मनातून चौधरी परिवाराचे आभार मानले. या सामाजिक कार्यात जुनेद चौधरी, जाकेर चौधरी, संतोष चांभारगे, जुबेर चौधरी,ड्रायव्हर अतिक शेख यांनी पुढाकार घेतला.


Post a Comment

0 Comments