साक्षर भारत प्रेरक/प्ररिका,आशा वर्कर,अंगणवाडी सेविकांची मानधन थकीत
प्रेरक प्ररिकांचे थकित मानधन रखडले... लातूरसह दहा जिल्ह्यातील थकित मानधनाचा प्रश्न ऐरणीवर... आंगणवाडीचे इरियेस वेळेवर मिळत नाही... तिन महिन्याचे मानधनही रखडले...
देवणी:प्रतिनीधी(विक्रम गायकवाड) कोरोना विषाणू संकटाचे गांभीर्य ओळखा घरातच रहा, आपल्याकडे काम करणाऱ्यांना या काळातील वेतन, मानधन द्या असे निर्देश राज्य सरकार आणि प्रशासन सर्वांना देत आहे. शासन निर्णय घेण्यात येऊनही जिल्हा परिषद, पंचायत समितीने कोणतेही अंमलबजावणी केली नाही. कोरोनाच्या लढाईत गावात आघाडीवर असलेल्या आशा कार्यकर्ती, अंगणवाडी कार्यकर्ती, प्रेरक/प्ररिका, संगणक परिचालक, ग्राम रोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी काम करीत आहेत मात्र यांचे मानधन अद्यापही मिळाले नाही.कोरोना आला आणि त्याने गाव, राज्यच नाही तर संपूर्ण देश थांबवला. त्याच्या दहशतीखाली विकासाचे चक्र थांबले. त्यामुळे मजूरांचे काम गेले शेतीमाल घरात राहिला. खायला मोताद झालेले लोक सरकारी तांदळावर दिवस ढकलत आहेत पण हातात पैसाच नसेल तर करायचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस मानधनाविना ठेवले आहेत. तर साक्षर भारत कार्यक्रमातील प्रेरक प्रेरिका यांचा मानधन सन २०१८ कार्यक्रम संपला. त्यावेळी ३५ महिन्याचे थकित आहे. दिवाळीत सन २०१९ मध्ये १३ महिन्याचे मानधन मिळाले आहे. आज तारखे १९ - २२ महिन्याचे मानधन थकित आहे.
लाॕकडाउनच्या कालावधीत तूटपुज्या मानधनावर गावपातळीवर काम करणाऱ्या या सर्वांसमोर आर्थिक संघट उभे टाकले आहे. गावातील कोरोना सर्व्हे, ग्रामस्थांना माहिती, सल्ला, जंतूनाशक फवारणी माहिती आॕनलाईन करणे स्वच्छता ठेवणे विविध प्रकारचे कामे गावपातळीवर असे महत्वपुर्ण कामे आशा कार्यकर्ती, संगणक, परिचालक, ग्रामपंचायत कर्मचारी, प्रेरक/प्ररिका, आशा, ग्रामरोजगार, अंगणवाडी सेविकांना करावे लागत आहे . सरकार माञ मानधन देणे हे फक्त कागदावरच असून अंमलबजावणी होत नाही. एकीकडे लाॕकडाउनची बंधने दूसरीकडे दैनंदिन खर्चासाठीही पैसे नाहीत. अशा कात्रीत गावापातळीवरचे कर्मचारी अडकले आहेत. यातून केंद्र सरकार व राज्य सरकार आणि प्रशासन त्वरित मार्ग काढावा थकित व नियमित मानधन त्वरित द्यावे प्रेरक व प्ररिका चे लातूर सह दहा जिल्ह्यातील थकित मानधन व शासनाच्या योजनेत समाविष्ट करा अंशकालीन मध्ये समाविष्ट करा आशी मागणी संघटनेच्या माध्यमातून वारंवार करीत आहे असे इशाराच्या प्रतिनिधीशी बोलताना देवणीचे प्रेरक लक्ष्मण रणदिवे व चाकूरचे उध्दव दुवे यांनी माहिती दिली.
0 Comments