निलंगा व्यापारी महासंघाच्या अध्यक्षावर कारवाई करण्याची मागणी
निलंगा:(प्रतिनिधी) साऱ्या जगात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता आपल्या भारत देशात कोरोनाचा प्रभाव वाढु नये यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात व महाराष्ट्रात लॉक डाऊन लागू केले या कायद्याची देशात मोठ्या प्रमाणात अंमल बजावणी होत आहे.परंतु निलंग्यात लॉक डाऊन ची अंमल बजावणी होताना दिसत नाही.असाच एक प्रकार काल दि १९ रोजी निलंग्यात उघडकीस आला आहे. लॉकडाऊनचा नियम तोडून अश्या आणीबाणी सारख्या गंभीर परिस्थितीत स्वतःचे उखळ पांढरे करून घेण्यासाठी येथील व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रल्हाद बाहेती यांनी दुकान उघडे ठेवून व्यापार करीत असल्याची एक चित्रफीत समाज माध्यमांवर फिरत आहे.यांची दखल घेत पत्रकार मोहन क्षिरसागर यांनी येथील व्यापारी महासंघाच्या अध्यक्षावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी डॉ. विकास माने यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे.दिलेल्या तक्रारीत पुढे असे नमूद केले आहे की, निलंगा शहरातील कापड व्यापारी तथा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रल्हाद बाहेती यांनी दिनांक १९ एप्रिल२०२०रोजी रविवारी दुकानाचे अर्धे दार दोन तास उघडे ठेवल्यामुळे १०ते१५ ग्राहक दुकानात येऊन कापड खरेदी करून घेऊन गेले.याच दिवशी येथील काही जागृत नागरिकांनी दुकान चालू असलेले फोटो व विडिओ कॅमेऱ्यात कैद करून घेऊन समाज माध्यमांवर फ़िरविल्यामुळे दिवसभर शहरात एकच चर्चेचा विषय होता. असे दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे उपविभागीय अधिकारी विकास माने काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 Comments