Latest News

6/recent/ticker-posts

लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्पयात जिल्हयाच्या सर्व सीमा कडेकोटपणे बंद कराव्यात

लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्पयात जिल्हयाच्या सर्व सीमा कडेकोटपणे बंद कराव्यात


लातूर:(प्रतिनिधी) केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी लॉकडाऊनचा कालावधी ३ मे २०२० पर्यंत वाढविण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या या दुसऱ्या टप्प्यात लातूर जिल्हयात एक ही कोरोनाबाधित रुग्ण् नाही. त्यामुळे लातूर जिल्हयाच्या सर्व जिल्हा सीमा व राज्य सीमांवर कडेकोट नाकाबंदी करावी, असे निर्देश पालकमंत्री या नात्याने लातूर जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
लातूर शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात पोलीस विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालय व महापालिकेस पदाधिकारी ,अधिकारी यांची व्यापक बैठक डोंवरी सकाळी घेतली 
यावेळी संसदीय कार्य, भूकंप पुर्नवसन, पाणी पुरवठा, सार्वजिनिक बांधकाम, रोजगार हमी योजना व पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर  चंद्रकांत बिराजदार    पोलीस उपअधिक्षक सचिन सांगळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील, महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त वसुधा फड यांच्यासह सर्व संबंधीत अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत बोलताना जिल्हयाच्या बाहेरील एकही व्यक्ती आपल्या जिल्हयात येणार नाही यासाठी सर्व जिल्हा सीमा व राज्य सीमांवर नाकाबंदी करावी. पोलीस विभाग व परिवहन विभागाने दक्षता घेण्याचे निर्देश दिले.त्याप्रमाणेच चेकपोस्टवर हाय रिझोल्युशनचे सीसीटीव्ही कॅमेरे बसावेत. कोणत्याही प्रकारे बाहेरील अनाधिकृत व्यक्ती जिल्हयात येणार नाही या बाबत सतर्क रहावे, असे त्यांनी सूचित केले. लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात अत्यावश्यक सेवेबरोबरच कृषि व कृषि आधारित उद्योग-व्यावसायांना परवानगी देण्यात आलेली आहे. परंतु या बाबत महापालिका व प्रशासनाने योग्य त्या उपाय योजना राबवून शहरी भागात नागरिकांची गर्दी होऊ देऊ नये. प्रत्येक ठिकाणी सामाजीक अंतराचे नियम पाळले पाहीजेत. तसेच नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे अन्यथा घरात बसूनच प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच घराबाहेर पडताना नाका-तोंडावर मास्क लावावा किंवा रुमाल बांधावा व सामाजीक अंतराचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन  केले.दुचाकीवर फक्त एकच व्यक्ती व चारचाकीमध्ये वाहनचालक व दुसरी एक व्यक्ती यांनाच परवानगी आहे. तरी विनाकारण दुचाकी –चारचाकी वाहन चालकांनी घराबाहेर पडू नये. या नियमांचे पालन न करणाऱ्यावर वाहनांवर पोलीस विभागाने कडक कारवाई करावी, असे निर्देश ही दिले. 
शहरी भागाच्या हद्दीबाहेरील धाबे, गॅरेज सुरु करण्याची परवानगी असली तरी या ठिकाणी सामाजीक अंतराचे पालन होत नसल्याचे निर्देशनास आल्यास ते तात्काळ बंद करण्याचे निर्देश ही त्यांनी दिले.लातूर महापालिकेने शहरात प्रवेश करण्याच्या सर्व सहा ठिकाणांवर चेक पोस्ट तयार करुन नाकाबंदी करावी. शेतकऱ्यांना कृषि विषयक खरेदीसाठी मुभा असेल परंतु प्रशासनाने दक्षता घ्यावी. तसेच लातूर शहरासह इतर सर्व नगर पालिकेच्या हद्दीबाहेरील रस्त्यावर चेक पोस्ट तयार करुन नाकाबंदी करावी, असेही  सांगितले. महानगरपालिकेने आवश्यक असेल तरच बांधकाम परवानगी बाबतची कार्यवाही करावी. प्रत्येक चेक पोस्टवर वैद्यकीय अधिकारी, पोलीस कॉन्स्टेबल, महापालिका/नगरपालिकाचा कर्मचारी ठेवावा. त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीची तपासणी व्हावी, असे निर्देश दिले.रमजान या सणास दिनांक २४ एप्रिल पासून सुरुवात होत आहे. तरी महापालिका व पोलीस  विभागाने शासनाच्या सूचनांप्रमाणे कार्यवाही करावी. पोलीस विभाग व परिवहन विभागाने परस्परांत समन्वय ठेवून जिल्ह्यात कोठेही अवैध वाहतूक होणार नाही याची  दक्षता घ्यावी. शासनाने ज्या आस्थापना चालू ठेवण्यास सांगितले आहे त्यासाठी आवश्यक परवानग्या प्रशासनाकडून घ्याव्यात, असे निर्देश दिले. जिल्हयातील नागरिकांनी कोरोनाच्या अनुषंगाने स्वत:हून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. त्याप्रमाणेच जिल्हयात कोठूनही इतर जिल्हयातील व्यक्ती आल्यास त्याबाबतची माहिती तात्काळ संबंधित शासकीय यंत्रणेला दयावी. जो पर्यंत संपूर्ण जग कोरोनामुक्त होणार नाही तोपर्यंत नागरिकांनी नियमांचे पालन करुन दक्षता घ्यावी, असे बैठकीच्या शेवटी आवर्जून नमूद केले.


Post a Comment

0 Comments