Latest News

6/recent/ticker-posts

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लातूर महानगरपालिकेने लाँच केला "घरपोच" ॲप. 

लातूर महानगरपालिकेने लाँच केला "घरपोच" ॲप. 


कोरोना संसर्ग टाळण्यासाठी:( प्रतिनिधी) कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळे उपाय केले जात आहेत. 
"सोशल डिस्टंसिंग" हा त्यातील सर्वात महत्वाचा आणि प्रभावी उपाय  आहे.पण हा उपाय प्रभावी ठरण्यासाठी लोकांना लागणार्या डेली निड्सच्या जिवनावश्यक वस्तू सहजतेने मिळायल्या हव्यात अन्यथा लाॅकडाऊन आणि पर्यायाने सोशल डिस्टंसिंग चा पुरता फज्जा उडतो याचे भान ठेवत लातूरच्या अन्वेष बिराजदार व रुपशे पाटील यांनी आपल्या PROWARE SOLUTION आणि ULPAT SOLUTION  च्या माध्यमातून व लातूर महापालिकेच्या सहकार्याने "घरपोच' या मोबाइल ॲपची निर्मीती केली आहे.
या ॲपच्या माध्यमातून ग्राहक त्यांना हव्या असणार्या जीवनावश्यक वस्तू किराणा,दुध, भाज्या,औषधं इत्यादी घरबसल्या मागवू शकतात ते ही झटपट आणि एकदम मोफत.या ॲपशी लातूर शहरातील सर्व भागातील अत्यावश्यक सेवा पुरवणार्या दुकानदारांना जोडण्यात आलं असून,हे दुकानदार ग्राहकांच्या मागणी प्रमाणे त्यांना फ्री होम डिलीवरी देतील तसेच ॲपसाठी ही ग्राहकांना कुठलाही चार्ज द्यावा लागणार नाही.हे ॲप पुर्णपणे फ्री असेल फक्त सोशल डिस्टंसिंग पाळली ज्यावी आणि कोरोना विरोधातील लढाई जिंकता यावी यासाठी हा ॲप बनवला गेला आहे.त्यामुळे लातूरकरांनी या ॲपचा वापर करून घरबसल्या आपल्याला आवश्यक असणार्या वस्तू मागवाव्यात आणि घरीच राहून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केलं आहे.


ॲप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
 www.ulpatsolution.com/apk/Gharpoch.apk
www.prowaresolutions.com/apk/Gharpoch.apk


Post a Comment

0 Comments