Latest News

6/recent/ticker-posts

सोशल मीडियावर आक्षेपार्ह व वादग्रस्त पोस्ट टाकल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील पोलीस निरीक्षक अनिल चोरमले यांचा इशारा

सोशल मीडियावर आक्षेपार्ह व वादग्रस्त पोस्ट टाकल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील पोलीस निरीक्षक अनिल चोरमले यांचा इशारा


निलंगा:(प्रतिनिधी) सध्या कोरोनाने संपूर्ण देशभर थैमान घातले असून काही लोकांकडून फेसबुक व्हाट्सअप वरती आक्षेपहार्य चुकीच्या पोस्ट टाकून अफवा पसरवण्यात येत आहेत. याची दखल घेऊन निलंगा पोलिस आणि आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. या पूर्वी जिल्ह्यातील इतर तालुक्यात ही असे गुन्हे दखल झाले आहेत.
याबाबतची माहिती अशी की कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. शिवाय फेसबुक वॉट्सअप वरती सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण विविध प्रकारच्या अफवा पसरवून धार्मिक तेढ निर्माण करत आहेत शिवाय कोणतीही माहिती परिपूर्ण नसताना अफवा पसरवून तेढ निर्माण करणाऱ्याना सायबर सेलकडून गुन्हे दाखल केले जातील असा ईशारा जिल्हाधिकारी जी. श्रीकांत व पोलिस अधिक्षक राजेंद्र माने यांनी काही दिवासापूर्वी दिले होते. असाच एक प्रकार निलंगा शहरात घडला असून फेसबुक व व्हाट्सअप वर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या प्रकरणी मयूर आंतरेड्डी रा. पेठ निलंगा व हंसराज शिंदे रा.पांचाळ कॉलनी निलंगा यांचेवर निलंगा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मिडीयाद्वारे कोणीही आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडिया वर टाकू नयेत असे आवाहन जिल्हा प्रशासन तर्फे करण्यात आले असताना सुद्धा असे प्रकार घडत आहेत यापुढे सोशल मीडियावर आक्षेपार्ह व वादग्रस्त पोस्ट टाकल्यास ग्रुप ऍडमीनवर गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा पोलिस निरीक्षक अनिल चोरमले यांनी दिला आहे.


Post a Comment

0 Comments