रमजान ईद(सण) करीता जमा करून ठेवलेली रक्कम मुख्यमंत्री साह्यता निधीस सुपूर्त
सोलापूर:(प्रतिनिधी) माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील बांगड्या व्यवसाय करणारे कुटुंब शमा तय्यब तांबोळी यांनी या देशात महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात कोरोना व्हायरस विषाणू या महाभयंकर रोगांमध्ये पछाडलेल्या रुग्णांना हातभार लावण्यासाठी एक सामाजिक काम म्हणून वेळापूर येथील सौ शमा तय्यब तांबोळी यांनी पोटाला कुटुंबाचा विचार न करता केवळ एक सामाजिक बांधिलकी म्हणून दहा हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधी सुपूर्त करण्यात आली त्या शमा तांबोळी महिलेने आरटीजीएस याद्वारे पाठवलेला आहे एक मुस्लिम महिला देशासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून काय करते याचे उत्तम उदाहरण या महिलेने तमाम जनतेला व महिलांना एक आदर्श दाखवून दिलेला आहे याचं उत्तम उदाहरण वेळापूर मध्ये आपणास पहावयास मिळत आहे अतिशय गरीब कुटुंबात वावरणाऱ्या या महिला बांगड्याच्या व्यवसायावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या शमा तांबोळी यांनी सामाजिक भान राखून आपण समाजाचे काहीतरी देणे आहे या महामारी विषाणूला रोखण्यासाठी व त्याला हद्दपार करण्यासाठी शासन दरबारी त्याने स्वतःच्या कष्टातून कमवलेले दहा हजार रुपये मुख्यमंत्री साहाय्यता निधीस आरटीजीएस माध्यमातून पाठवलेले आहेत त्याच्या या कामगिरीला वेळापूर परिसरातील तमाम ग्रामस्थांतून कौतुक होत आहे या महिलेचा विशेषता मुस्लिम महिलेचा आदर्श इतर समाजातील दानशूर सामाजिक विविध संस्थेतील पदाधिकारी असणाऱ्या महिलांनी धडा घ्यावा शमा तांबोळी यांनी भीषण काळात संकट काळात दाखवलेले औदार्य काळाची गरज आहे
सौ शमा तांबोळी यांना त्यांचे पती तय्यब मुलगा अल्ताफ यांची द्वितीय कन्या नसरीनभाऊ पत्रकार मुसा भाई आतार यांनी त्यांना प्रेरणा दिली.
0 Comments