Latest News

6/recent/ticker-posts

चाकूरकराना मास्क न वापरने पडले महाग;बावीस हजार रुपये दंड वसुल

चाकूरकराना मास्क न वापरने पडले महाग;बावीस हजार रुपये दंड वसुल


नगरपंचायत प्रशासनांची चाकुर शहरात धडक कारवाई 


चाकुर:(ता.प्रतिनिधी:सलीमभाई तांबोळी) चाकुर शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणावर मास्क न लावता फिरणार्या नागरिकांवर चाकुर नगरपंचायची कारवाई आज चाकुर शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी थुंकणे,व सोशल डिस्टन्सिंग न पाळणार्या व्यक्तीविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली,यामध्ये १०६ लोकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली असुन २२,०००/ शंभर रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा,सोशल डिस्टंन्सिग पाळावे,सार्वजनिक ठिकाणी थुंकु नये व कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाला सहकार्य करावे.असे आवाहन मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांनी केले.
आज चाकुर शहरात विविध ठिकाणी जाऊन चाकुर नगरपंचायतचे कर्मचारी व अधिकारी यांनी कारवाई केली.
या दंडत्मक कारवाईत नगरपंचायत कर्मचारी भरतसिंह ठाकुर,निजामोदीन शेख अभियंता,प्रमोद कास्टेवाड,सुधाकर कांबळे,मुकुंद मस्के,प्रशांत झांबरे,प्रसन्ना जोशी,स्वच्छतेचे चव्हाण आदि होते.


Post a Comment

0 Comments