Latest News

6/recent/ticker-posts

चाकुर तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिकांनी बँकेतून पैसे काढण्यासाठी दिलेल्या तारखा जाणून घ्या 

चाकुर तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिकांनी बँकेतून पैसे काढण्यासाठी दिलेल्या तारखा जाणून घ्या 


नागरिकांनी बँकेत गर्दी करु नये,दिलेल्या वेळेतच प्रत्येक गावातील नागरिकांनी येऊन व्यवहार करावा- तहसिलदार डॉ.शिवानंद बिडवे यांचे नागरिकांना आव्हान.


चाकुर:(ता.प्रतिनिधी:सलीमभाई तांबोळी) कोरोना विषाणू हा अतिगंभीर स्वरुपांचा साथीचा आजार जगभर पसरत असुन जागतिक आरोग्य संघटना (WOH) हा आजार संसर्गजन्य आजार म्हणून घोषित केला आहे.त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी लातुर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये लातुर जिल्हा नागरी/शहरी भागाकरिता दि.२३/३/२० ते ३१/३/२० पर्यंत  प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे.याच विषयाचे अनुषंगाने पतप्रधान मोहदयांनी २५/३/२० ते ३/५/२० संपूर्ण देश लॉकडाऊन जाहिर केले आहे.तसेच चाकुर तालुक्यातील बँकेतुन पैसे काढण्याच्या निमित्ताने प्रमाणापेक्षा जास्त गर्दी होत आहे.सोशल डिस्टंसिंग चे पालन होत नसल्याचे निदर्शनास दिसुन येत आहे.या करिता चाकुर तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिकांनी पैसे काढण्यासाठी आप आपल्या गावा समोरील दिलेल्या तारखे दिवशी बँकेत येऊन आपले व्यवहार करावे.चाकुर शाखा अलगरवाडी,बोरगांव १६/४, बोथी १७/४, भाटसांगवी,बनसावरगांव १८/४, चाकुर २० व २१/४, हणमंतवाडी,मष्णेरवाडी २२/४, मांडुरकी,मंहाडोळ २३/४, नागदरवाडी,नागेशवाडी २४/४,रोहीणा २७/४, शिरनाळ,सरणवाडी २८/४,सांडोळ,तिर्थवाडी २९/४, तिवघाळ,तिवटघाळ ३०/४/तळघाळ,टाकळगांव २/५,उजळंब ३/५,आष्टा शाखा आष्टा १६/४,गांजुर१७/४ महाळगा १८/४ सुगांव २०/४,जगळपुर २१/४ ज्या गावातील नागरिकांना आपले आर्थिक व्यवहार करावयांचे आहे.त्यांनी आपल्या गावा समोरील दिलेल्या तारखे दिवसीच बँकेत येऊन व्यवहार करावे.सर्व नागरिकांनी बँकेत आपले व्यवहार करण्यासाठी आल्यास सोशल डिस्टंसिग चे पालन करावे व कोरोनावर मता करण्यासाठी प्रशासनांने दिलेल्या नियमांचे पालन काटेकोर करावे असे आव्हान तहसिलदार डॉ.शिवानंद बिडवे यांनी चाकुर तालुक्यातील नागरिकांना केले.


Post a Comment

0 Comments