जनधन योजनेतील पैसे पोस्टाद्वारे घरपोच मिळण्याची व्यवस्था
लातूर:(प्रतिनिधी) जनधन योजनेतून मिळणारी रक्कम पोस्टामार्फत घरपोच देण्याची घोषणा केंद्र शासनाकडून करण्यात आली आहे, त्यामुळे या खात्यातील रक्कम काढण्यासाठी लाभार्थ्यांनी बॅकेसमोर गर्दी करू नये असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.कोवीड १९ विषाणू प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली आहे. या परिस्थितीत घराबाहेर पडणे,गर्दी करणे यावर प्रतिबंध घालण्यात आले आहेत असे असले तरी सध्या जनधन खात्यातील पैसे काढण्यासाठी नागरिक बँका समोर मोठी गर्दी करताना दिसत आहेत. यावेळी सामाजिक अंतर पाळण्याचा नियम ही पाळण्यात येत नाही, त्यामुळे यातून कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची भीती आहे. हे टाळण्यासाठी केंद्र शासनाने जनधन योजनेतील पैसे पोस्टाद्वारे घरपोच देण्याची योजना आखली आहे. येणाऱ्या एक ते दोन दिवसात हे पैसे घरपोच मिळणार आहेत त्यामुळे नागरिकांनी या खात्यातील पैसे काढण्यासाठी घराबाहेर येण्याची तसेच बँका समोर गर्दी करण्याची गरज नाही. या सर्वांना पैसे घरपोच मिळणार असल्याने नागरिकांनी घरीच थांबून कोरोना विरुध्दचे युद्ध जिंकण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.
0 Comments