Latest News

6/recent/ticker-posts

२० व्यक्तींच्या स्वॅब  नमुन्यांपैकी १२ निगेटिव्ह, तर ८ पॉझिटिव्ह

२० व्यक्तींच्या स्वॅब  नमुन्यांपैकी १२ निगेटिव्ह, तर ८ पॉझिटिव्ह



लातूर:(प्रतिनिधी) विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दिनांक ३ एप्रिल २०२० रोजी रात्री २० व्यक्तींचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. ते नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत काल रात्री पाठवण्यात आले त्यापैकी बारा व्यक्तींचे नमुने निगेटिव आलेले आहेत तर उर्वरित आठ व्यक्तीचे स्वॅब नमुने पॉझिटिव्ह आलेले आहेत. तसेच त्या सर्व रुग्णांना विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात ॲडमिट करण्यात आले असून
जिल्हात कोरोना संसर्ग झालेले आठ रूग्ण आढळले आहेत. याबद्दल सविस्तर वृत्त असे की मुळचे आंध्रप्रदेशातील कुर्नुल गावचे प्रवासी हे हरियाणातील फिरोजपुर जिल्यातील झरका येथे जमात साठी वास्तव्यात  होते येथुन प्रवास करत ते त्यांच्या गावाच्या दिशेनी निघाले होते.
गाडी ड्रायव्हरने त्यांना निलंगा येथेच सोडून पळून गेला असे समजते हे सर्व सध्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय सर्वोपचार रूग्णालयात लातूर येथे दाखल करण्यात आले व यांच्या स्वैबचे नमुने राष्ट्रीय विषाणु संस्था पुणे येथे पाठविले गेले. तिथुन या आठही प्रवासी कोरोना संसर्गित आढळुन आले असून रुग्णांची प्रकृती स्टेबल असल्याची  माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.


Post a Comment

0 Comments