Latest News

6/recent/ticker-posts

सामाजिक जाणिवेतून केले १००० मास्क चे वाटप

सामाजिक जाणिवेतून केले १००० मास्क चे वाटप


चाकुर:(ता.प्रतिनिधीः सलीम तांबोळी)
रि.पा.ई.तालुकाध्यक्ष पपन कांबळे यांनी स्वहखर्चातुन मास्कचे वापट केले.आज संपूर्ण जग हे कोरोना या महारोगाच्या विळख्यात सापडलेले आहे. सबंध जगाला याचा फटका बसलेला आहे. याच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज चाकूर येथे सामाजिक जाणिवेतून रिपाइंचे चाकूर तालुकाध्यक्ष  पपन कांबळे यांच्या वतीने प्रभांग क्रमांक २ मध्ये १००० मास्क चे वाटप करण्यात आले. यावेळी घरोघरी जाऊन कोरोना या रोगाबद्दल जनजागृती करण्यात आली,कोरोना पासून कशी आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, याबाबत समुपदेशन करण्यात आले.नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन करावे,प्रशासनांने वेळोवेळी  घालुन दिलेल्या नियमांचे पालन करावे,आपले हात सतत साबणांने स्वच्छ धुवावे रस्त्यावर गर्दिच्या ठिकाणी जाऊ नये अशी जनजागृती करण्यात आली.मास्कचे वाटप  चाकूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयवंतराव चव्हाण  उपनगराध्यक्ष नितीन रेड्डी,शिवसेना नेते सुभाषदादा काटे, पो.हे.कॉ.रामचंद्र गुंडरे,पिंटू गायकवाड, नितीन डांगे,बबलू पठाण, राम डांगे,आबासाहेब महालिंगे,अमर वाघमारे, लखन वैरागे,शुभम महालिंगे,हे उपस्थित होते.
एक हजार मास्कचे वाटप प्रभांगाच्या लोकांच्या आरोग्यच्या दृष्टीने अति महत्त्वाचे आहे.नागरिकांनी मास्कचे योग्यरित्या वापर करावे.स्वतःचे रक्षण स्वतःच करावे असे आव्हान पपन कांबळे यांनी प्रभाग क्रमांक दोनच्या नागरिकांना केले.


Post a Comment

0 Comments