लातूर शहरातील गरजू जैन बांधवांना दैनंदिन जीवनावश्यक वस्तूचे वाटप
लातूर:(प्रतिनिधी) शहरातील जैन बांधवांवर कोरोना आपत्तीमुळे व्यवसाय व्यापार ठप्प झाल्याने दैनंदिन वस्तूंची अडचणी येऊ नयेत म्हणून श्री १००८ चिंतामणि पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर चे अध्यक्ष राजीव बुबणे यांच्या संकल्पनेतून आपल्या समाज बांधवांना कोरोना बंद च्या काळामध्ये भटकंती करावी लागू नये म्हणून त्यांच्या महावीर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अंतर्गत व युवक युवती संघटना लातूर यांच्या माध्यमातून दिनांक ३१ पर्यंत आलेल्या नावातून ५० नावे निवडून त्यांच्या घरापर्यंत साखर अडीच किलो गहू पीठ पाच किलो डाळ एक किलो तांदूळ अडीच किलो मीठ पुडा तेल पुडा कपड्याचं व अंगाचा साबण चहापत्ती अशा दैनंदिन गरजेच्या वस्तू प्रत्येकांच्या घरपोच देण्यात आल्या याकामी शहरातील दानशूर व्यक्ती राजीवजी बुबणे,अजय कस्तुरे, विजय अन्नदाते,महेंद्रजी दुरुगकर,प्रफुल्ल शहा,किशोर जैन, शोभाताई कोंडेकर यांनी दिलेल्या दानातून सदरील वस्तू समाजातील घटकापर्यंत पोहोचवण्यात आले आहे.याकामी अहिंसा युवक-युवती मंडळाचे अतुल बोपलकर,सारंग बुबणे,शोभाताई कोंडेकर,अनिलजी टाकळकर यांनी परिश्रम घेतले.
समाजातील ५० गरजवंत व्यक्तींना दैनंदिन जीवनावश्यक वस्तूचे वाटप घरपोच करण्यात आले.
0 Comments