Latest News

6/recent/ticker-posts

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोंपे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत निलंग्यात १२१ जणांनी केले रक्तदान

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोंपे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत निलंग्यात १२१ जणांनी केले रक्तदान



निलंगा:(प्रतिनिधी) कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्यात रक्ताचा तुटवडा मोठया प्रमाणात जाणवत असल्याने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोंपे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत निलंगा शहरात १२१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.राम नवमी दिवशी निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्वप्रथम सकाळी अरविंद पाटील निलंगेकर यांनी रक्तदान केले.त्यानंतर त्यांच्या समूहातील अनेकांसह शहरातील १२१ जणांनी यावेळी रक्तदान केले. 
या शिबिरात रक्तदान करण्यासाठी प्रत्यक्षात ४०० जणांनी आयोजकाकडे नोंदणी केली होती.परंतु सोशियल डिस्टनसिंगची अडचण येवू नये म्हणून गुरुवारी पहिल्या टप्प्यात १२१ जणांनी रक्तदान केले. या शिबिरात पोलीस कॉ. शीतल सिंदाळकर, मरपल्ले यांनीही रक्तदान केले. अनिल अग्रवाल यांनी रक्तदात्यासाठी निलंगा राईसची सोय केली होती.यावेळी तहसीलदार गणेश जाधव,नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे,वैद्यकिय अधिक्षक डाँ.दिलीप सौंदळे,डाँ.प्रल्हाद सोळुंके,डाँ.उध्दव जाधव, डाँ.शेषेराव शिंदे,डॉ. लाला देशमुख, डॉ. जाधव, डॉ.कदम,विनोद सोनवणे,परमेश्वर शिंदे, प्रोमोद कदम,साजिद पटेल,उत्तम शेळके,अँड.गोपाळ इंगळे,शाहूराज पाटील,किशोर जाधव,अजित लोभे, अंकुश धाणूरे, एम एम जाधव, इर्शाद शेख सह आरोग्य अधिकारी,पत्रकार,सामाजिक व राज्यकीय कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments