Latest News

6/recent/ticker-posts

डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस, सफाई कामगार यांच्या कार्याच्या सन्मानार्थ

डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस, सफाई कामगार यांच्या कार्याच्या सन्मानार्थ


'कोरोना फायटर्स' ७५ जणांनी केले रक्तदान; रक्तदान करणाऱ्याला मास्कचे मोफत वाटप


लातूर:(प्रतिनिधी) सध्या देशात कोरोना या महाभयंकर आजाराने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा होऊ नये म्हणून तरुणांनी 'कोरोना फायटर्स' या ग्रुप मार्फत रक्तदान शिबीर घेतले. या शिबिरात सुमारे ७५ बाटल्या रक्तसंकलन झाले. दिव्यांग व्यक्ती बसवराज पैके यांनी स्वतः रक्तदान करून शिबिराचे उद्घाटन केले.
रक्ताचा तुटवडा होऊ नये यासाठी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी तरुणांनी एकत्र येऊन 'कोरोना फायटर्स' ग्रुपची निर्मिती केली. या ग्रुपच्या माध्यमातून लातूर शहरातील सिद्धेश्वर हाऊसिंग सोसायटी येथे हे रक्तदान गुरुवारी संपन्न झाले. माऊली ब्लड बँकेने रक्त संकलन साठी सहकार्य केले. तरुणांनी एकत्रित येऊन केलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. या रक्त संकलन मध्ये बँक कर्मचारी, पत्रकार, शिक्षक, युवक, शासकीय कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. रक्तदान करणाऱ्याला सेवालय मधील मुलांनी बनविलेले मास्क मोफत वाटण्यात आले. गो कोरोना अशा घोषणाही देण्यात आल्या.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा.योगेश शर्मा,अजित चिखलीकर, किशोर जाधव, प्रवीण पवार, संतोष धानुरे, रजनीकांत जाधव, मारुती हल्लाळे, प्रशांत सातपुते, रोहित पवार, अविनाश कुलकर्णी, वैभव कुलकर्णी, सचिन शिंदे, उत्तम तेलंगे, शंकर चांडेश्वरे, सागर चांडेश्वरे, गोटू महाराज आदींनी परिश्रम घेतले.रक्त संकलन साठी माऊली ब्लड बँकेचे अध्यक्ष डॉ. उमाकांत जाधव, प्रमोद सूर्यवंशी, सोमनाथ बरुरे, संगमेश्वर बुरबुरे, दत्ता वैद्य, कविता हुडे, शिवानी गायकवाड, प्रियांका वाघमारे, खंडू झुंजारे यांनी मदत केली. दरम्यान, सर्वांनी रक्तदान या कार्यात योगदान द्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.


Post a Comment

0 Comments