तालुक्यात दुसरी घटना;विजेच्या धक्काने शाळकरी मुलासह दोन शेळीचा मृत्यु
चाकूर:(तालुका प्रतिनिधी सलीम तांबोळी)
चापोली येथुन जवळ असलेल्या मधुसुदन बांगड विद्यालय आजनसोंडा ता चाकुर येथील शाळकरी विद्यार्थी संदीप बंडु तेलंगे (१७) या विद्यार्थ्याचा दि ०७/०४/२०२० रोजी मृत्यु झाला.
याबाबत मिळालेल्या माहीतीनुसार ०७/०४/२०२० सकाळी ०७.०० च्या दरम्यान संदीप तेलंगे हा शेतात शेळी चारत असतान काल आलेल्या अचानक वादळी वार्यामुळे डि पी चा तार पडला होता. त्या ताराला शेळी अडकली तसेच त्या शेळीचा पाय अढकला आहे असे समजून संदीपने शेळीचा पाय ओढत असताना संदीप तेलंगे (१७) याच्यासह दोन शेळीचाही जागीच मृत्यु झाला.
या घटनेची माहीती कळताच चाकुर तालुक्याचे महावितरणचे उपविभागीय अभियंता अभिजीत अडगुबे , बीट जमादार सुभाष हरणे, पो काँ सुकेश केंद्रे ,पो काँ माधव सारोळे सह आदींनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी ग्रामीण रूग्णालय चाकुर येथे घेऊन गेले आहेत अशी माहीती त्यांनी दिली.
चाकुर तालुक्यात अश्या प्रकार घडण्याची दुसरी वेळ आहे व दुर्देवाची गोष्ट म्हणजे दोन्ही घटनेत ईयत्ता दहावी ची विद्यार्थी यांचा दुर्देवाने मृत्यु झाला.
या घटनेने आजनसोंडा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे
0 Comments