Latest News

6/recent/ticker-posts

विशेष ---> SUPPORT NURSES AND MIDVIVES 

SUPPORT NURSES AND MIDVIVES


जागतिक आरोग्य दिन 1950 पासून जगभर साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटना प्रत्येक वर्षी एक घोषवाक्य देत असते. या वर्षीचे (२०२०)
जागतिक आरोग्य संघटनेने 
 SUPPORT NURSES AND MIDVIVES 
हे घोषवाक्य निश्चित केलेले आहे"  
आज संपूर्ण जग कोरोनामय झालेले आहे, यावेळी परिचारिका आपल्या जिवाची पर्वा न करता सेवा देत आहेत, 
कारण 'परिचर्या', सेवा, शुश्रुषा हे फक्त उपजीविकेचे साधन नाही, अत्यंत उदात्तपणे स्वीकारलेली सेवावृत्ती
 आहे.
परंतु गेली अनेक वर्षे हा पविञ व्यावसाय उपेक्षित/ दुर्लक्षित होताना दिसतो, व्यावसायाच्या उन्नतीसाठी गेली अनेक दशकांमध्ये ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत,
अपुरे मनुष्यबळ, अपुऱ्या सेवा सुविधा, अपुरा साहित्य पुरवठा, ह्या बाबी तर आहेतच, त्याचबरोबर अत्यंत जोखमीच्या वातावरणात परिचारिका काम करत असुनही जोखीम भत्ता, संरक्षण विमा, दिला जात नाही, जिथे त्या वास्तव्यास असतात तो समाज ही आज  त्यांना निर्भयपणे स्वीकारत नाही तर यांच्याकडून संसर्ग होईल का या भितीखाली वावरतो
त्यामुळे मानसिक तणावाखाली  परिचारिकांना सेवा द्याव्या लागतात, अर्थात रुग्णसेवेच्या पाठीचा कणा समजला जाणारा परिचारिका संवर्ग आज असंख्य समस्यांच्या विळख्यात आहे.
म्हणूनच  परिचर्या व्यावसायाची जननी, आद्यपरिचारीका फ्लारेंन्स नाईटिंगेल यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त, जागतिक आरोग्य संघटनेनी २०२० हे वर्ष NURSES YEAR असे घोषित केले.....
परिचारिका शिवाय रुग्णालये किंवा रुग्णसेवा अशक्य बाब आहे त्याचबरोबर, MIDVIVES म्हणजेच प्रसुतीच्या अवघडलेल्या अवस्थेतून सुटका करणारी स्ञी, ती परिचारीकाच आज अवघडलेल्या अवस्थेत आहे, उपेक्षित आहे दुर्लक्षित आहे
आज कोरोनाच्या निमित्ताने जगभर तिच्या कार्याचे मोल सर्व स्तरावर दिसून येत आहे, कौतुक करण्यात येत आहे, दुसरीकडे अडचणी मांडणाऱ्या परिचारीकांचा आवाज दाबलाही जातो, म्हणूनच  अपेक्षा आहे त्या सेवावृत्तीच्या समस्यांची ही दखल शासन, प्रशासनाकडून घेतली जावी, 
व हा जिवाची कुटुंबाची पर्वा न करता करत असलेल्या कार्याचे कौतुक कोरोनापुरते मर्यादित न राहता


कायमस्वरूपी व समाजमान्य व्हावे.....


श्रीमती सुमित्रा तोटे
राज्यसचिव
महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर


Post a Comment

0 Comments