निटूर ग्रामपंचायत कार्यालय मार्फत कोरोना संदर्भात दुसरी आढावा बैठक
निटूर:(प्रतिनिधी: कुशाबा कांबळे) कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून
येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल,निटूर येथे ग्रामपंचायत कार्यालय मार्फत कोरोना संदर्भात दुसरी आढावा बैठक घेण्यात आली.
बैठकीत खालील विषयावर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले.१)लॉकडाऊन मध्ये उद्यापासून सकाळी ८ ते १२ दरम्यान किराणा दुकान सुरू असतील,गावातीलच भाजीपाला विक्रेत्यांनी घरोघरी जाऊन भाजी विक्री करावी २) राशन वाटप -नियमित महिन्याचे पैसे देऊन उद्यापासून सुरू हॊईल सकाळी ८ ते १२ व सायंकाळी ४ ते ७ एका दुकानात रोज ५० कार्ड धारकांना वाटप होईल १० तारखेनंतर फ्री राशन वाटप होणार आहे ३)उज्वला गॅस वाटप-सर्व उज्वला गॅस धारकांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत दर महिन्याला जमा होतील ते ही पहिल्या महिण्याला गॅस घेतला तर दुसऱ्या महिन्याचे पैसे जमा होतील याची नोंद घ्यावी ४)जनधन खाते - या खातेवर पैसे जमा झाले आहेत बँकेत गर्दी न करता उद्यापासून सावळे ग्राहक सेवा केंद्र या ठिकाणी पैसे काढता येतील ५) ग्रामपंचायत-२री औषध फवारणी पूर्ण होत आली आहे लवकरच मास्क व हँडवॉश लिक्विड वाटप होईल ६) गावाच्या सुरक्षेसाठी पोलीस व शासकीय यंत्रणेला मदत करण्यासाठी ग्रामरक्षा दलाची स्थापना वार्डश: होणार आहे ७)नागरिकांना सूचना -बाहेरून कुणी गावात येणार नाही याची काळजी घेणे,विनाकारण रस्त्यावर येऊ नये,शासकीय यंत्रणेला मदत करावी
यावेळी सरपंच परमेश्वर हासबे,उपरपंच संगमेश्वर करंजे ,तलाठी आर.बी.कुलकर्णी,ग्रामसेवक एस.सी मिरखलकर,आरोग्य सेवक बी.जी.धनेधर, राशन दुकानदार पाटील,राठोड, गॅस पुरवठादार योगेश पाटील,सर्वअंगणवाडी ताई,सर्व आशाताई,ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
शेवटी सरपंच परमेश्वर हासबे यांनी ग्रामस्थांना उद्देशून दवाखान्यात जाऊन बसण्यापेक्षा घरी बसावे खासकरून सर्व तरुण मित्र विनाकारण चौका चौकात गोळा होऊ नका सहकार्य करा
0 Comments