चाकूर येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १५१ जणांचे रक्तदान
चाकूर:(ता.प्रतिनिधी:सलीम तांबोळी) कोरोंना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतीय जनता पार्टी लातूरच्या वतीने अनेक उपाययोजना करण्यात येत आहे.त्यामध्ये भारतीय जनता पार्टी चाकूरच्या वतीने तालुकाध्यक्ष शिवाजीराव बैनगीरे यांच्या पुढाकारातून ५ एप्रिल रविवार रोजी रक्तदान शिबीर नगरपंचायत सभागृहामध्ये घेण्यात आले.
यावेळी १५१ रक्तदात्यांनी रक्तदान करुन या कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले.
लातूर जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संभाजी पाटील निलंगेकर,खासदार सुधाकर श्रृंगारे आणि जिल्हाध्यक्ष रमेशअप्पा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे.
त्यामध्ये २ एप्रिल रोजी गरजु व गरीब नागरिकांना अन्न व भोजन वाटप करण्यात आले आहे.
यावेळी भारतीय जनता पार्टी चाकूरच्या वतीने चाकूर येथे रक्तदान शिबिराचें आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबीरात १५१ जणांनी रक्तदान केले आहे.यावेळी भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, माजी बांधकाम सभापती प्रकाश देशमुख,जिल्हा उपाध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर, माजी पं समिती सभापती वसंतराव डिगोळे, चाकूर तालुकाध्यक्ष शिवाजीराव बैंनगीरे,अहमदपूर तालुकाध्यक्ष हणमंत देवकत्ते, तुकाराम मद्दे, चाकूर शहराध्यक्ष प्रशांत बिबराळे, कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक संजय पाटील,शहर सरचिटणिस अशोक शेळके,भाजयुमोचे गजानन करेवाड,साईप्रसाद हिप्पाळे,इम्रान गुळवे दयानंद सूर्यवंशी, भरत गुरमें, शंकर चाटे, बाबूराव खलंग्रे , अजित खंदारे, विनोद रामपुरे, आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments