Latest News

6/recent/ticker-posts

चाकूर येथे चारचाकी व मोटर सायकलवर पोलीसांची धडक कारवाई

चाकूर येथे चारचाकी व मोटर सायकलवर पोलीसांची धडक कारवाई



चाकुर:(ता.प्रतिनिधी:सलीम तांबोळी) शासनाच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण लातुर जिल्हात कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून आदेश पारीत केले असताना हि विनाकारण मुक्त संचार करुन कोणतेही सुरक्षेची काळजी न घेता.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढेल असे घातक कृतीकरुन स्वतःचे व इतर जनतेच्या जीवितास व व्यक्तीगत सुरक्षितेस बांधक कृती करीत असताना मोटर सायकल व चार चाकी वाहन मिळुन आले.
दि.६/४/२०२० रोजी १२-३० वाजता जुने बसस्थानक जवळ पोलीस निरीक्षक जयंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.रामचंद्र गुंडरे,पो.कॉ.पिराजी पुट्टेवाड नाकाबंदी करीत असताना मोटार सायकल व कार यांच्या वर कारवाई करण्यात आली. बाबुराव सुनील केंगार वय २३वर्ष रा.अलगरवाडी ता.चाकुर मो.सा.क्रमांक एम.एच.ए.ऐक्स.९४३२ गंगाराम विष्णारामजी चौधरी वय ३६ वर्ष रा.एस.बी.आय.बँकसमोर पाटील बिल्डिंग चाकुर मो.सा.क्रमांक  एम.एच.२४ बी.सी.५२४४ मारोती अशोक सोमवंशी वय २६ वर्ष रा.गणेश मंदीरजवळ चाकुर मोटर सायकल क्रमांक एम.एच.२४ ए.झेड.९६४८ तानाजी जनार्धन गुंजुटे वय ३४वर्ष रा.सांडोळ ता.चाकुर मो.सा.क्रमांक एम.एच.२४ ए.एम.८६७२ संतोष नारायण गायकवाड वय ४३ वर्ष रा.सलगरा मु.ता.जि.लातुर मो.सा.क्रमांक एम.एच.१२ ए.एफ.बी.३२४२ अफजल महमद नबीखॉ वय २६ वर्ष रा.नापगाडा मुंबई ह.मु.संग्राम अण्णारोड लातुर लातुररोड ता.चाकुर मो.सा.क्रमांक एम.एच.११.सी,के.५३४१ आरबाज शौकत बागवान वय २१वर्ष रा.बौध्दनगर लातुर,स्विप्ट डिझायर कार एम.एच.२४.ए.एफ.८०८० रस्त्यावरून संचारबंदीचे उल्लंघन करुन फिरत असल्यामुळे त्याच्या विरोध  कलम १८८,२७० भादंवी रा.आ.कायदा २००५ कलम ५१(ब) साथरोग अ.१८९७ कलम ३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास पो.हे.कॉ.रामचंद्र गुंडरे करित आहेत.


Post a Comment

0 Comments