डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि सफाई कामगार यांच्या सेवा गौरवार्थ
लातूर:(प्रतिनिधी) आपण पाहतोय कोरोना या महामारी आजाराने थैमान घातले असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता डॉक्टर,आरोग्य कर्मचारी,पोलीस,सफाई कामगार आणि अत्यावश्यक सेवा देणारे सर्व आपल्या सुरक्षेसाठी कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्याचा सन्मान व्हावा म्हणून आपण १० एप्रिल रोजी सकाळी ९ ते ५ यावेळेस कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन फुलांचा वर्षाव करून कृतज्ञता व्यक्त करायांचे आवाहन प्रा.योगेश शर्मा,
वसुंधरा प्रतिष्ठान,लातूरच्या वतीने करणयात आले आहे
खालीलप्रमाणे आपल्याला जे शक्य आहे त्यातील एक उपक्रम राबवावा आणि या सेवा देणाऱ्या सर्वांचे मनोबल वाढवावे.
१) डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस, सफाई कामगार यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी यांच्यावर फुलांचा वर्षाव करावा.
२) आपल्या परिसरात आलेल्या या सेवार्थ व्यक्तींचा फुल देऊन सन्मान करावा.
३) रांगोळीच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करावी....
४) सॅल्युट करून त्यांना मानवंदना द्यावी....
पण हे सर्व करताना सोशल डिस्टनसिंग चे पालन करावे आणि हे पालन केले म्हणजे तोच खरा त्यांचा गौरव असेल
सदर उपक्रमाचे फोटो अथवा व्हिडीओ ९८५००२८७११ किंवा ९९७५४७१०८७ या व्हाट्सअप्प नंबर वर टाकावेत, त्यांचा योग्य तो सन्मान केला जाईल असे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
0 Comments