Latest News

6/recent/ticker-posts

अन्नधान्य जेवणाचे वाटप करताना फोटो व्हिडिओ चित्रीकरण करण्यास मनाई- जिल्हाधिकारी

अन्नधान्य जेवणाचे वाटप करताना फोटो व्हिडिओ चित्रीकरण करण्यास मनाई- जिल्हाधिकारी 


लातूर:( प्रतिनिधी) राज्यात कोरना  विषाणू covid-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना चालू आहेत.
 या लाॅकडाऊनच्या काळात अनेकजण अन्नधान्य, जेवण ,फुडपाॅकेट,अथवा इतर मदत देत असतानाचे फोटो, व्हिडिओ काढून ते माध्यमावर टाकल्यास अर्थात त्याची प्रसिध्दी केल्यास साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात येतील असे परिपञक लातूरचे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी काढले आहे.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाॅकडाऊनची मुदत ३० एप्रिल  पर्यत वाढविण्यात आली आहे.दरम्यान अनेकजण गरजूंना मदत म्हणून अन्नधान्य,जेवण, ईतर मदत देत आहेत.चार आण्याची मदत करून बारा आण्याची प्रसिध्दी करवून घेण्याची प्रवृती वाढली.अशा मदतीचे फोटो, व्हिडिओ काढून ते मोठ्या प्रमाणात सोशल मिडियात टाकत असत,यातून गरिब, गरजू यांचा स्वाभिमान दुखावला जाऊ  शकतो. हि परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांनी हा आदेश काढला आहे जी.श्रीकांत यांनी काढलेल्या या निर्णयाचे सर्वञ स्वागत होत आहे.दानशुरांना आता गरजू गरिबांना मदत करता येईल पण प्रसिध्दी करता येणार नाही.
असे निदर्शनास आल्यास साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ अन्वये दिलेल्या तरतुदीनुसार भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल अशा फोटो प्रेमीवर कार्यवाही करण्यात येईल.


Post a Comment

0 Comments