Latest News

6/recent/ticker-posts

लातूर जिल्हासाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांची कोरोना संसर्ग बचावासाठी मदत

लातूर जिल्हासाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांची कोरोना संसर्ग बचावासाठी मदत


लातूर:(सतीश तांदळे) लातूरच्या सार्वजनिक दसरा महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रकाश पाटील वांजरखेडकर यांनी केलेल्या मागणीची दखल घेत केंद्रीय ग्राहक संरक्षण तथा अन्न पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी कोरोना संसर्ग बचावासाठी आवश्यक २५००० मास्क आणि ६०० सॅनिटायझर बाटल्यांची उपलब्धता विनाशुल्क करून दिली आहे.लातूर शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी जीवघेण्या कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वसामान्य जनतेसाठी मास्क आणि सॅनिटायझरची आवश्यकता आहे. मात्र लातूर जिल्ह्यात या वस्तूंची कमतरता असल्याने आणि सहज उपलब्ध होत नसल्याने सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या वतीने प्रकाश पाटील यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना लातूर शहर आणि ग्रामीण भागातील जनतेसाठी मास्क आणि सॅनिटायझर उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. यास सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीय मंत्री दानवे यांनी लातूर शहर आणि ग्रामीण जनतेसाठी २५००० मास्क आणि ६०० बाटल्या सॅनिटायझरची व्यवस्था केली आहे.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने लवकरच याचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे. सार्वजनिक दसरा महोत्सव समिती आणि लातूरकरांच्या वतीने केंद्रीय ग्राहक संरक्षण तथा अन्न पुरवठा राज्यमंत्री यांचे आभार मानले आहेत.


Post a Comment

0 Comments