चाकूर तालुक्यातील विजेच्या तारेचा धक्का लागून मृत्यू पावलेल्या शेतमजुराच्या कुटूंबास मदत
लातूर:(प्रतिनिधी) चाकूर तालुक्यातील शिवणी मांजर येथे विजेच्या तारेचा धक्का लागून मृत्यू पावलेल्या शेतमजुराच्या कुटूंबास तसेच ज्यांची जनावरे या धक्क्यात दगावली होती. त्या शेतकऱ्यास पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या सुचनेनंतर महावितरणने आर्थिक मदत दिली आहे.
या संदर्भातील अधिक माहिती अशी की, मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवडयात झालेल्या वादळी पावसात शिवणी मांजर येथील विजेची तार तुटून शेतात पडली होती. गावकऱ्यांनी कल्पना देऊन्ही महावितरणने तेथील विजपुरवठा खंडीत केला नव्हता दुसऱ्या दिवशी या परिसरात उत्तम विठठल अलापुरे जनावरे चारत असतांना ते व काही जनावरे सदरील तारेचा धक्का बसून मृत्यू पावले.
या अपघाताची माहिती मिळतच लातूर जिल्हयाचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी महावितरणच्या अधिकाऱ्याशी संपर्क सांधून मयत मजूरांच्या कुटूंबास व ज्यांची जनावरे दगावली त्या शेतकऱ्यास नियमानुसार आर्थिक मदत देण्याच्या सुचना केल्या होत्या. पालकमंत्री यांच्या सुचनेनंतर महावितरणने १३ एप्रिल रोजी उत्तम अलापुरे यांच्या पत्नी सत्यभामा अलापुरे यांना ३ लाख ८० हजार रुपये तर ज्यांची जनावरे दगावली ते शेतकरी अमोल मधुकर चामे यांना १ लाख १ हजार २५० रूपये एवढी नुकसान भरपाई अदा केली आहे. पालकमंत्री यांनी वेळीच अपादग्रस्थाना मदत मिळवुन देण्यासाठी सुचना केल्या बददल शिवणी मांजर ग्रामास्थांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
0 Comments