नागरिकांनी धैर्य बाळगावे;सात गोष्टी लक्षात ठेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी
३ मे पर्यंत लाँकडाउन कायम- पंतप्रधान नरेंद्र मोदी
नई दिल्लीः कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉक डाउन संपूर्ण देशात घोषित केला होता.तो २१ दिवसाचा लॉक डाउन आज १४ एप्रिल रोजी समाप्त होत आहे.या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी दहा वाजता जनतेशी संवाद साधत लॉक डाऊन ३ मे पर्यंत वाढवला असल्याची अधिकृत घोषणा केली आहे.संपूर्ण देशात तीन मे पर्यंत लॉक डाउन असणार आहे.परंतु या लाँक डाउन काळातील गाईडलाईन उद्या जाहिर करणार असल्याचे पंतप्रधान यांनी सांगितले.
इतर देशांच्या तुलनेत कोरोनाचा सामना भारताने नियोजनबद्ध केला
तेव्हा भारताने लॉकडाऊन घोषित केले
आर्थिक दृष्टीने मोठी किंमत चुकवली आहे
मर्यादा असलेल्या संसाधनांच्या सोबत घेऊन आपण कोरोनाचा चांगला प्रतिकार केला
लोकांना येणाऱ्या अडचणी कशा दूर केल्या जातील याकडे लक्ष देण्यात येईल.
जिथे कोरोना नियंत्रणात येईल त्याठिकाणी काही प्रमाणात २० एप्रिल नंतर निर्णय घेण्यात येईल
३ मे पर्यंत संपूर्ण देशात पूर्णपणे लॉकडाऊन कायम राहील
रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांसाठी २० एप्रिलपासून काहीप्रमाणात शिथिल करण्यात येईल
कोरोना विरोधी औषध बनविले जात आहे
नागरिकांनी धैर्य बाळगावे
सात गोष्टी लक्षात ठेवा
१) आपल्या घरातील जेष्ठ नागरिकांची काळजी घ्यावी
२) लॉक डाऊन सोशल dishtanse पालन करावे
३) आयुष मंत्रालयाच्या निर्देशाचे पालन करावे
४) आरोग्य सेतू मोबाईल अप डाउनलोड करा
५) गरीब परिवाराना मदत करा भोजन पूरवा
६) आपल्या व्यवसायातील कर्मचाऱ्यांना सांभाळा कामावरून काढू नका
७) डॉक्टर, नर्स, प्रशासन यांचा आदर करा, अनादर होऊ देऊ नका
देशाला वाचविण्यासाठी सप्तपदी पालन करा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशवासियांना आवाहन.
0 Comments