निटूर,केळगाव येथे जनतेने घरीच राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली
निटूर:(प्रतिनिधी) कोवीड-१९ आणि लॉकडाऊनच्या पाश्वभुमिवर मंगळवारी महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सामाजिक अंतर पाळत घरीच साजरी झाली आंबेडकर जयंती निलंगा तालुक्यातील निटूर,केळगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केळगावचे तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष कांबळे यांच्या घरी साजरी करण्यात आली बाबासाहेबाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून संविधान प्रास्ताविक व उद्देशिकेचे वाचन करून जयंती घरीच साजरी करण्यात आली सरपंच शकील पांढरे,उपसरपंच बाबुराव राठोड,माजी सरपंच समद पांढरे सह तंटामुक्ती उपाध्यक्ष दत्ता काळे आदींची उपस्थिती होती तर निटूर ग्रामपंचायत सदस्य बळीराम राम मधाळे सौ. रेखा बळीराम मधाळे यांनी निवासस्थानी जयंती साजरी केली.
कोरोना कोव्हीड-१९ संकटावर मात करण्यासाठी सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सीग) चे पालन सर्वांनी करणे आवश्यक आहे. त्यामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त एकत्रित येणे, गर्दी करणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह ठरणार नाही. या सर्व परिस्थितीचा विचार करून सामाजिक कार्यकर्ते अनुयायी आणि जनतेनेही घरातच थांबून यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करून जयंती साजरी केली
0 Comments