केळगाव परिसरात वाऱ्या-वादळ सह पाऊस शेतातील अनेक एकरवरील ज्वारी भुईसपाट
निटूर:(प्रतिनिधी) निलंगा तालुक्यातील केळगाव परिसरात सोमवारी सायंकाळी मेघगर्जनेसह जोरदार अवकाळी गारांचा पाऊस झाला त्यात अनेक शेतकर्यांचे उभे पीक भुईसपाट झाले व शेतातील पिकांचे व भाजीपाला व साठवलेल्या बी बियाणे,खतांचे नुसकांन झाले व तासाभरात शिवार पाणी पाणी झाले होते.
सोमवारी सकाळपासून वातावरण कमालीचा उकाडा जाणून लागला होता.अचानक ५:०० वाजता विजांच्या कडकडाट व सुसाट्याचा वारा वाहू लागला व जोरदार पावसाची हजेरी झाली पावसाचा जोर जास्तच होता.लाईट गुल झाली अनेक झाडे उन्मडून पडली मधेमधे पावसात गारांचा सडा पडत असल्याने शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली गावातील अनेक जणांच्या घरावरील पत्रे उडून गेली शेतातील ज्वारीच्या पिकांचे व कडब्याचे मोठे नुसकांन झाले आहे.अनेक एकरवरील उभी ज्वारी भुईसपाट झाल्याने राबीची मेहनत वाया गेली आहे व आर्थिक फटका बसला असून इतर पालेभाज्या पण बडऊन निघाल्या आहेत सायंकाळी ५:०० पासून ते ७:३० पर्यंत अवकाळी पाऊस सुरूच होता. केळगाव,बसपूर,खडकउमरगा ,कलांडी,झरी, काटेजवळगा, सह निलंगा तालुक्यातील अनके गावात अवकाळीची हजेरी होती अधून मधून गारानिही झोडपून काढले आहे.
अमर गवारे, शंकर चव्हाण,व्यंकटे,विलास गवारे, जोतिराम पाटील यांचे पीक आडवे पडले आहे तर
व्यंकटराव गवार यांच्या शेतातील पत्र्याचे शेड उडून गेल्याने शेतात ठेवलेली चार क्विटल कांडा बी बियाणे खाते किटकनाशकांचे।मोठे नुसकांन झाले आहे व शेतातील ज्वारी आडवी पडल्याने शेतकरी निराश झाले आहेत शंकर चव्हाण यांच्या शेतातील जनावरांचे शेड व दोन झाडे व ज्वारी आडवी पडली आहे.अचानक झालेल्या अवकाळी पाऊस व गरामुळे अनेक शेतकऱ्याच्या उभे पीक मातीमोल झाले आहे त्यामुळे लवकरात लवकर प्रशासनाने अवकाळी पावसामुळे नुसकांन झालेल्या ज्वारी पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्याला भरपाई द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनाकडून होत आहे.
0 Comments