Latest News

6/recent/ticker-posts

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरी थांबूनच साजरी करावी

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरी थांबूनच साजरी करावी


   लातूर:(प्रतिनिधी) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल रोजी आहे. सध्या कोरोना-१९ च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊनची  स्थिती आहे त्यामुळे  सामाजिक कार्यकर्ते, आनुयायी  आणि जनता या सर्वांना विनंती आहे की त्यांनी या वर्षीची जयंती घरातच थांबून साजरी करावी. 
   शासनाने कोरानाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी ३० एप्रिल पर्यत लॉकडाऊनचा कालखंड वाढविला आहे. कोरोना कोव्हीड-१९ संकटावर  मात करण्यासाठी  सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सीग) चे पालन सर्वांनी करणे आवश्यक आहे. यामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त एकत्रित येणे, गर्दी करणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह ठरणार नाही  त्यामुळे सर्वांनी घरातच थांबून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली  अर्पण करून जयंती साजरी करणे गरजेचे आहे. सर्वजण या सूचनेचे पालन करतील असा विश्वास अमित विलासराव देशमुख व्यक्त केला.


Post a Comment

0 Comments