निटूर येथे ग्राम सुरक्षा रक्षकांना ओळखपत्राचे वितरण
ग्रामपंचायत कार्यालय मार्फत कोरोना संदर्भात तिसरी आढावा बैठक संपन्न
निटूर:(प्रतिनिधी) कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल,निटूर येथे ग्रामपंचायत कार्यालय मार्फत कोरोना संदर्भात तिसरी आढावा बैठक घेण्यात आली. प्रमुख्याने गावामध्ये वार्ड वाईस आरोग्य सेविका आशा वर्कर संबंधित वोर्ड प्रमुख व ग्राम सुरक्षा दलातील प्रतिनिधी यांच्यामार्फत मास्क आणि साबून त्यांचे वितरण करण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले उपाय योजनेचा भाग म्हणून उपस्थित पोलीस उपनिरीक्षक एम.स्वामी व ग्राम विकास अधिकारी,सरपंच परमेश्वर हासबे आरोग्यविषयक उपाययोजना या संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामसुरक्षा दलातील काही सुरक्षा रक्षकांना ओळखपत्राचे वितरण करून त्यांचे कार्य व कर्तव्य यासंदर्भात सूचना देण्यात आल्या यावेळी क्षेत्रीय अधिकारी ए.एन.बिराजदार सरपंच परमेश्वर हासबे,उपरपंच संगमेश्वर करंजे,ग्रामसेवक एस.सी.मिरखलकर, राजकुमार सोनी,आरोग्य सेवका,सर्व आशा वर्कर,ग्रामपंचायत कर्मचारी ग्राम सुरक्षा दलातील कुशाबा कांबळे,काशिनाथ बुरकुले, बळीराम मधाळे,विशाल शिंदे, कृष्णा शिंदे, दत्ता शिंदे,राजू चव्हाण,सोमनाथ सोनवळकर,प्रशांत निटूरे,बाशीद गस्ते,संदीप मगर सह इतर ग्राम सुरक्षा दलातील सुरक्षा रक्षक उपस्थित होते.सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ग्रामसेवक शाहूराज मिरकलकर यांनी केले.
0 Comments