Latest News

6/recent/ticker-posts

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर पोलीसांची धडक कारवाई

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर पोलीसांची धडक कारवाई विनाकारण रस्त्यावर फिरणार्याच्या विरोधात कडक कारवाई करणार 
पोलीस निरिक्षक जयंतराव चव्हाण 


चाकुर: ता.प्रतिनिधी(सलीमभाई तांबोळी) महाराष्ट्रात राज्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णात वाढ होत असल्यांचे चिञ दिसत आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन आहे.संचारबंदी असल्यामुळे शासनांच्या नियमांचे तंतोतंत पालन करा घरी राहा सुरक्षित राहा असे वारंवार पोलीस प्रशासना तर्फे आव्हान करण्यात येत आहे.चाकुर येथील जुने बसस्थाकाजवळ शुक्रवारी दि.९ रोजी दुपारी १-३० वाजता दरम्यान पोलीस निरीक्षक जयंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक खंडु दर्शने पो.हे.कॉ.रामचंद्र गुंडरे पोलीसांना मोटर सायकल वर कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून आदेश पारीत केले असताना विनाकारण मुक्त संचार करुन कोणत्याही सुरक्षेची काळजी न घेता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढेल असे घातक कृती करुन स्वतःचे व इतर जनतेच्या जीवितेस व व्यक्तीगत सुरक्षितेस बांधक कृती करीत असताना मोटर सायकल चालवत होते.मंगेश दिगंबर तिगोटे वय २६ वर्ष,वशिम फारुख पटेल वय २५ वर्ष, माधव लक्षमण कांबळे वय ३२ वर्ष संतोष माधव तात्पुरे वय २८ वर्ष,पंडीत नामदेव पवार वय ४९ वर्ष नौवशाद नासार मिर्झा अशा सात वाहनांच्या विरोधात गुरन १२८ ( २०२० कलम २७९,१८८,२७०,भादवि राष्ट्रीय आपत्ती २०१५ कलम ५१ ब नुसार गुन्हा दाखल पुढील तपास पो.हे.कॉ.रामचंद्र गुंडरे करीत आहे.


Post a Comment

0 Comments