Latest News

6/recent/ticker-posts

१६०० रुपये जमा;आठ जणांकडून दंड वसूल

१६०० रुपये जमा;आठ जणांकडून दंड वसूल


निटूर:(प्रतिनिधी) दि.१७ सार्वजनिक ठिकाणावर मास्क न लावता फिरणार्या नागरिकांवर निटूर ग्रामपंचायतने दंडात्मक कारवाई करत आठ जणांना दंड ठोठावला सार्वजनिक ठिकाणी थुंकणे,व सोशल डिस्टन्सिंग न पाळणार्या व्यक्तीविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली,यामध्ये 8 लोकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली असुन आज रोजी १६०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.
या मोहिमेत ग्रापंचायत कार्यालय निटूरचे सरपंच परमेश्वर हासबे,उपसरपंच संगमेश्वर करंजे, ग्रामविकास अधिकारी शाहूराज मिरकलकर,तलाठी कुलकर्णी, कॉन्सटेबल गोमारे, ग्रामपंचयत कर्मचारी नारायण उपळे व ग्राम सुरक्षा रक्षक जे नागरिक सोशल डिस्टन्सिंग,सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व मास्क न लावता
 फिरताहेत यांच्याकडं दंड वसूल करण्यात येत आहे.
 नियमाचे पालन करा व कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आव्हान ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येत आहे


Post a Comment

0 Comments