Latest News

6/recent/ticker-posts

अंगणवाडी सेविका,आशा वर्कर यांना मास्क, सॅनीटायझर पुरविले जाईल

अंगणवाडी सेविका,आशा वर्कर यांना मास्क, सॅनीटायझर पुरविले जाईल


 लातूर:(प्रतिनिधी) ग्रामीण भागात अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर घरोघरी जाउन कोवीड-१९ च्या संदर्भाने सर्व्हे करीत आहेत परंतु त्यांच्याकडे कोणतीच सुरक्षेची साधने नाहीत या बाबत पत्रकारांने टेलीकॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित पत्रकार संवाद कार्यक्रमात विचारले असता, ज्या ठिकाणी कोवीड रूग्णालये आहेत त्या ठिकाणी केंद्र शासनाच्या सुचनेनुसार डॉक्टर्स व कर्मचारी यांना सुरक्षाकीट देण्यात आले आहेत. इतर रूग्णालये तसेच गावपातळीवर या संदर्भातील सुरक्षा सांधने पुरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अंगणवाडी सेविका तसेच आशा वर्कर यांचे कामही अत्यंत महत्वाचे आहे त्यामूळे त्यांची काळजी घ्यावी लागेल त्यांना सॅनीटायझर आणि मास्क पुरविण्या बाबत तातडीने सुचना दिलया जातील. 
बचत गटा मार्फत चार लाख मास्क तयार झाल्याची माहिती आपणाकडे आली आहे ते मास्क घेऊन संबंधितांना तातडीने वितरीत करण्याच्या सुचना दिल्या जातील.


Post a Comment

0 Comments