मुस्लिम बांधवांनी रमजान महिन्यात शासनाच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे
पोलीस निरीक्षक जयंतराव चव्हाण पोलीस स्टेशन चाकुर
चाकुर:(ता.प्रतिनिधीःसलीमभाई तांबोळी)
महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रसार होत आहे.त्यासाठी शासनामार्फत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.त्यानुसार मुस्लिम बांधवांनी पविञ रमजान महिन्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या सुचनांचे पालन करावे असे आहवान पोलीस निरीक्षक जयंतराव चव्हाण यांनी केले आहे.विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १४ मार्च पासुन साथरोग प्रतिबंध अधिनियम १८९७ लागु करण्यात आलेला आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधत्मक उपाययोजना म्हणून सामाजिक,सांस्कृतिक,राजकीय,धार्मिक,क्रिडाविषयक कार्यक्रम रद्द करण्याबाबत १४ मार्गच्या अधिसुचन्वये सुचना देण्यात आलेले आहेत.शासनाने दिलेल्या सुचना च्या अंमलबजावणी अनुषंगाने मुस्लिम बांधवांचा पविञ महिना रमजान २५ एप्रिल पासुन सुरुवात होत आहे.रमजान महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव मुस्जिद मध्ये जाऊन तसेच सार्वजनिक रित्या नमाज पठण करायची पध्दत आहे.त्यामुळे मुस्लिम समाजातील नमाज तरावीह व इफ्तारसाठी एकञ येतात.सध्या स्तिती विचारात घेता अधिक संख्येने लोक एकञ आल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामधुन मोठ्या प्रमाणावर जीवित हानी होऊ शकते.त्यामुळे पविञ रमजान महिन्यांमध्ये मुस्लिम बांधवांनी शासनाच्या सुचनांचे पालन करावे असे आहवान जयंतराव चव्हाण यांनी केले आहे.
दरम्यान कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सध्या सुरु आसलेले लॉकडाऊनच्या परिस्थितीत ज्याप्रमाणे सामाजिक विलगीकरणांचे पालन करण्याबाबत राजशासनांने दिलेल्या सुचना प्रमाणे पविञ रमजान महिन्यामध्ये काटेकोरपणे पालन करुन अंमलबजावणी करण्यात यावी.
कोणत्याही परिस्थितीत मुस्लिम बांधव मज्जिदीमध्ये नियमित नमाज पठन तरावीह इफ्तारसाठी एकत्र येऊ नये घरच्या इमारतीच्या छतावर एकञ येऊन नियमित नमाज पठण अथवा इफ्तार करण्यात येऊ नये.मोकळ्या मैदानावर एकञ जमुन नियमित नमाज इफ्तार करु नये.लोकांकडून कोणतेही सामाजिक धार्मिक किंवा कौटुंबिक कार्यक्रम एकञित येऊन साजरे करु नयेत सर्व मुस्लिम बांधवानी घरातच नियमित नमाज पठण करावे इतर कोणत्याही लोकांना धार्मिक कार्यक्रमात समाविष्ट करु नये या सणांचे जनतेने काटेकोरपणे पालन करुन आपले कर्तव्य पार पाडुन समाजातील लोकांचे व आपल्या कुटुंबियांच्या आरोग्य व सुरक्षितेला प्राधान्य देणे आपले कर्तव्य असल्याचे पोलीस निरीक्षक जयंतराव चव्हाण यांनी म्हटले आहे.
0 Comments