Latest News

6/recent/ticker-posts

परशुराम कर्मचारी महासंघाचे  कार्य प्रशंसनीय- डॉ.विपिन जिल्हाधिकारी

परशुराम कर्मचारी महासंघाचे  कार्य प्रशंसनीय- डॉ.विपिन जिल्हाधिकारी


नांदेड:(प्रतिनिधी) आज भगवान परशुराम जयंतीनिमित्त परशुराम कर्मचारी महासंघाने जो उपक्रम हाती घेतला आहे तो खरोखर प्रशंसनीय आहे असे मत डॉ.विपिन जिल्हाधिकारी नांदेड यांनी व्यक्त केले आणि सदर उपक्रमाची माहिती जाणून घेतली परशुराम कर्मचारी महासंघातर्फे श्रीकांत कुलकर्णी यांनी माहिती जिल्हाधिकारी यांना सादर केली सदर माहितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी महासंघाचे कार्य उत्तम असल्याचा निर्वाळा दिला श्रीकांत कुलकर्णी यांनी माहिती खालील प्रमाणे दिली १००० लोकांना कोरोना पासून बचाव  होणे साठी सुती कॉटन चे मास्क वाटप करण्यात आले सदर  मास्क भाजीपाला विक्रेते,फळ विक्रेते,गॅस सिलेंडर वाटप करणारे,दूध वाटप करणारे,पोस्टा चे कर्मचारी महावितरण चे कर्मचारी,पोलीस कर्मचारी,जिल्हाधिकारी कार्यालय कर्मचारी ,ओझे वाहणारे ,पिण्याचे पाणी घरोघरी जाऊन देणारे व्यक्ती ,दिव्यांग व्यक्ती ,सिनियर सिटीझन ,अश्या अनेक जणांना १००० मास्क भगवान परशुराम ब्राम्हण कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा नांदेड यांच्या कडून वाटप करण्यात आले व लॉक डाउन काळामध्ये परशुराम ब्राह्मण कर्मचारी महासंघातर्फे २५० व्यक्तींना अन्न धान्य किट(ज्यात गव्हाचे पीठ १० किलो ५ किलो तांदूळ १ किलो डाळ १ किलो गोडेतेल १ साबण आदी साहित्य) गरजू ज्या मध्ये स्वयंपाकी, त्यांच्या हाताखाली काम करणारे ,मंदिरातील पुजारी ,छोटा व्यवसाय करणारे व्यक्ती मोल मजुरी करणारे याना  वाटण्यात करण्यात आली सदर उपक्रमाची माहिती   जिल्हाधिकारी साहेब यांना दिल्यानंतर त्यांनी सदर परशुराम कर्मचारी महासंघाचे काम उत्तम असल्या ची भावना व्यक्त केली  या वेळी  जिल्हाधिकारी साहेब सोबत प्रसाद कुलकर्णी तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड हे उपस्थित होते.श्रीकांत कुलकर्णी, प्रलोभ कुलकर्णी, डॉ मुकुंद कुलकर्णी, परीक्षित कुलकर्णी,अनिरुद्ध सिरसाळकर,गंगाधर जामकर, जिवन शेवाळकर,आशिष वाटेगावकर,समर्थ कुलकर्णी,माधवराव माळवटकर,व्यंकटेश पांडे,दीपक कुलकर्णी,डॉ.उदयकुमार पाध्ये,मंगेश मुळे,श्रीकांत पांडे,मंगेश देशमुख,गजानन कुलकर्णी,उदय कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.
परशुराम कर्मचारी महासंघातर्फे विजयकुमार मगर पोलीस अधीक्षक नांदेड यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात बॉक्स देण्यात आले यावेळी वेळेस श्री देशपांडे पोलीस निरीक्षक DSB शाखा नांदेड हे उपस्थित होते.डॉ.शरद कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांना  प्रातिनिधिक स्वरूपात मास्क चे बॉक्स देण्यात आले.


Post a Comment

0 Comments