महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त ६५ जणांनी केले रक्तदान
शिरूर अनंतपाळ:(प्रतिनिधी) समतानायक महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त कोरोनाच्या संकटसमयी रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन शिरूर अनंतपाळ नागरिकांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने अतुल जटाळे तहसिलदार शिरुर अनंतपाळ, पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम व डॉ.अरविंद भांताब्रे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर रक्तदानास सुरूवात झाली. या रक्तदान शिबिरात उत्स्फूर्तपणे ६५ जनांनी रक्तदान केले. रक्तदान हेच जीवनदान समजून रक्तदान करणारे रक्तदाते खरोखरच या संकटसमयी येऊन त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. विशेष बाब म्हणजे हळद लागलेला नवरदेव निलेश बालाजी हिंगमिरे या युवकांने रक्तदान देऊन सर्वानांच आचबिंत केले. तसेच राघवेंद्र पोतदार यांनीही आपला वाढदिवस रक्तदान करून साजरा केला. या प्रसंगी रक्तदात्यांचे कौतुक करावे तितके कमी आहे. रक्तदान शिबिराला तालुक्याचे आरोग्याधिकारी पवार, राष्ट्रवादीचे महाराष्ट्र युवा कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी भेट दिली. लातूर येथील अर्पन रक्तपेढीतील टेक्निशियन यांनी रक्त गोळा करण्याचे काम केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी देविदास सांगवे, गोविंद हंद्राळे, वीरनाथ बेंबळगे, प्रमोद धुमाळे, अनिल देंवंगरे, अमोल कामगुंडा, मुसा मुजेवार, नागेश तोंडारे, प्रतिक पारशेट्टे, ऋत्विक सांगवे, संदिप धुमाळे, गणेश बिराजदार, अविनाश आचवले इत्यादींनी परिश्रम घेतले.
0 Comments