Latest News

6/recent/ticker-posts

उदगीर येथील कोरोना पॉझिटिव ७० वर्षीय महिलेचा मृत्यू

उदगीर येथील कोरोना पॉझिटिव ७० वर्षीय महिलेचा मृत्यू


लातूर:(प्रतिनिधी) उदगीर उपजिल्हा रुग्णालयात दिनांक २३ एप्रिल २०२० रोजी अत्यावश्यक अवस्थेत एक ७० वर्षीय महिला रुग्ण दाखल झालेली होती. या दाखल झालेल्या ७० वर्षीय  महिलेचा कोरोना स्वाब रिपोर्ट आज दुपारी पॉझिटिव आलेला होता. तसेच या महिला  रुग्णास मधुमेह व रक्तदाब आजार होते व त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यांना आयसीयूमध्ये दाखल केले होते. रुग्णालयातील वैद्यकीय पथकाकडून  त्यांच्यावर उपचार सुरु असताना आज दुपारी ४ वाजून १५ मिनिटांनी या कोरोना पॉझिटिव महिलेचा मृत्यू झालेला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी दिली आहे.


Post a Comment

0 Comments