लातूर जिल्ह्यातील सर्व बाजार समिती आवारात काय काय सुरू राहणार जाणून घ्या
लातूर:(प्रतिनिधी) करोना- १९ लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर लातूर शहर व संपूर्ण जिल्ह्यात कोठेही अन्नधान्याची टंचाई निर्माण होऊन जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून लातूर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितींच्या आवारात गहू व ज्वारीची दुकाने चालू ठेवण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण,सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहेत.पालकमंत्री देशमुख यांच्या निर्देशानुसार शेतकऱ्यांची आडचण दूर करण्यासाठी सामाजिक अंतराचे नियम पाळून लातूर जिल्यातील सर्व ११ ही कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे व्यवहार नियमित सुरू केले आहेत.सध्याच्या लॉकडाऊन मुळे मालवाहतुकीला बऱ्याच आडचणी येत आहेत. परिणामी अन्नधान्याचीही टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन धान्याचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी बाजार समिती परिसरात गहू व ज्वारीची दुकाने सुरू ठेवण्याच्या सूचना पालकमंत्री देशमुख यांनी दिल्या होत्या त्यानुसार सदरील दुकाने सुरू करण्यात येत आहेत शेतकऱ्यांचा भाजीपाला विक्री व्हावा तसेच शहरवासीयांना भाजीपाला नियमित उपलब्ध व्हावा म्हणून पालकमंत्री देशमुख यांच्या सुचनेवरून लातूर तसेच जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने नियमित भाजीपाला मार्केटही सुरू केले आहे.
0 Comments