Latest News

6/recent/ticker-posts

चाकूरातील ६ वीत शिकणाऱ्या मुलीने कोरोना मुक्तीच्या लढ्याला मदत म्हणून प्रधानमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले सोन्याचे दागिने 

चाकूरातील ६ वीत शिकणाऱ्या मुलीने कोरोना मुक्तीच्या लढ्याला मदत म्हणून प्रधानमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले सोन्याचे दागिने


आपल्या कानातील सोन्याचे अंदाजे १० हजार रुपये किंमतीचे दागिने प्रधानमंत्री सहायता निधीस


चाकुर:(ता.प्रतिनिधी: सलीमभाई तांबोळी) येथील सहावीत शिकणाऱ्या मुलीने कोरोनामुक्तीच्या लढ्याला छोटीशी मदत म्हणून प्रधानमंत्री सहायता निधीसाठी आपल्या कानातील दहा हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने देऊन आपल्यातील सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले आहे. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर हे कोरोनामुक्तीच्या लढ्याला सहकार्य म्हणून पंतप्रधान सहायता निधीसाठी शहरातून निधी संकलित करीत आहेत. शहरात पानटपरीचा व्यवसाय करून आपला संसार चालविणारे राम शिवाजी पाटील यांनी त्यांना घरी बोलावून घेतले. या कुटुंबात तीन मुली व पती-पत्नी राहतात. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले काम करीत असून त्यांच्या कार्याला आमचाही काही हातभार लागावा म्हणून आम्ही मदत देणार असल्याचे त्यांनी सांगितले. बालाजी पाटील चाकूरकर हे घरी गेले असता तीन मुली आणि पती पत्नी असा परिवार असलेल्या कुटुंबातील छोटी मुलगी सोनाक्षी वय ९ वर्ष हिने तिच्या वाढदिवसाला खाऊसाठी दिलेले ६०६ रुपये व ६ वीत शिकत असलेली प्रियंका हिने आपल्या कानातील सोन्याचे अंदाजे १० हजार रुपये किंमतीचे दागिने काढून माझ्या हातात दिले व राम व त्यांची पत्नी सौ.शिला यांनी ११०० रुपये हे मोदीपर्यंत पोहचवण्याची विनंती केली. त्यावेळी त्या दोन्ही लहान मुलीचे व पत्नीचे उद्ग्गार ऐकून मी भावविवश झालो असे पाटील याने इशारा शी बोलताना सांगितले


Post a Comment

0 Comments