महात्मा बसवेश्वर मनामनात,जयंती घराघरात ...
यंदा महात्मा बसवेश्वर महाराज यांची ९१५ वी जयंती तारखेप्रमाणे २५ एप्रिल रोजी तर तिथीप्रमाणे २६ रोजी साजरी करण्यात येत आहे.
लातूर:(प्रतिनिधी) या वर्षी जयंतीच्या काळात कोरोना कोविड विषाणू रोगाच्या साथीमुळे शासकीय आदेशानुसार टाळेबंदी संचारबंदी जमावबंदी लागू करण्यात आल्यामुळे जयंती उत्सवाचे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत.त्यामुळे लिंगायत धर्मातील सत्तर जातीतील तिनशे पन्नास पोटजातील शरण शरणी व इतरही सर्व बसव प्रेमी घरोघरी जयंती साजरी करणार आहेत.या वर्षी सोशल मेडियाच्या माध्यमातून जयंती निमित्त शुभेच्छा व महात्मा बसवेश्वरांच्या जीवनावश्यक तत्त्वज्ञान विचार याची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात होत आहे. जगभर हा जयंती उत्सव लिंगायत धर्मीय जातपात, गरीबी श्रीमंती, अंधश्रध्दा न पाळता समता बंधूता निर्माण करीत साजरा करतात.तिथी प्रमाणे अक्षयतृतीया रोजी हा जयंती उत्सव साजरा केला जातो. महात्मा बसवेश्वर यांची जन्मभूमी कर्नाटक, कर्मभूमी महाराष्ट्र, व या शेजारील आंध्र प्रदेश, तेलंगाणा, तामिळनाडू, गोवा, मध्यप्रदेश, केरळ, दिल्ली, उत्तर प्रदेश इत्यादी राज्यातही हा जयंती उत्सव साजरा केला जातो.
या वर्षी घरोघरी महात्मा बसवेश्वर व त्यांचे सातशे शरण सत्तर शरणी यांनी निर्माण केलेले वचन साहित्य याचे वाचन चिंतन केले जाणार आहे. तसेच जयंती दिनी ईष्टलिंगयोगा कायक सदाचार दासोह करून महात्मा बसवण्णा यांना घरोघरी आदरांजली वाहिली जाणार आहे. या वर्षी सोशल मेडिया फेसबुक व्हाँट्सअँप इन्स्टाग्राम ट्विटर च्या माध्यमातून अनेक उपक्रमांचे स्पर्धा सजावट प्रश्न मंजुषा व्याख्याने इत्यादीचे आयोजन करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने शासकीय पातळीवर राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात रविवारी २६ एप्रिल रोजी महात्मा बसवेश्वर यांची जयंती लाँकडाऊनमुळे प्रातिनिधीक स्वरूपात साजरी होईलच. अशी माहिती लिंगायत एकीकरण समितीचे प्रमुख प्रा. संगमेश्वर पानगावे यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली आहे. लाँकडाऊनच्या काळात सर्व बसव प्रेमी हे महात्मा बसवण्णाची जयंती घरीच साजरे करणार असले तरी महाराष्ट्रातील सर्व शहरातील गावातील महात्मा बसवेश्वर महाराज व इतरही थोर महापुरूष समाजसुधारक यांचे पुतळे मूर्ती यांना त्या त्या ठिकणच्या स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत येणाऱ्या महानगरपालिका नगरपरिषदा ग्रामपंचायत नगरपंचायत प्रशासनाने लोकप्रतिनिधीने पुढाकार घेऊन जयंतीदिनी व त्यापूर्वी स्वच्छ पाण्याने अभिषेक करून पुतळा व परिसर स्वच्छता सुशोभिकरण लाईट डेकोरेशन रंगरंगोटी करून त्या ठिकाणी जयंतीदिनी महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यास मूर्तीस पुष्पहार पुष्पमाला अर्पण करून फिजिकल डिस्टन्शिग पाळून प्रातिनिधीक स्वरूपात अभिवादन करून सन्मान करून लिंगायत धर्मीयांची अस्मिता जोपासली जावी व त्याचे फोटो सोशल मेडियावर प्रसिद्ध केले जावेत अशी अपेक्षा प्रा.पानगावे यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
0 Comments