Latest News

6/recent/ticker-posts

जैन समाजाच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक

जैन समाजाच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक


 


औसा:(प्रतिनिधी: नदीम सय्यद) कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे  सर्वत्र लॉक डाऊन करण्यात आले असल्यामुळे यावर्षी भगवान महावीर जयंती अत्यन्त साधेपणाने साजरी करण्यात आली. जयंती महोत्सवाच्या सर्व खर्चास फाटा देऊन यावर्षी येथील जैन समाज बांधवांनी जमेल त्या निधीमधून एक फ्रिज खरेदी केला व तो शुक्रवारी औसा येथील ग्रामीण रुग्णालयास प्रदान करण्यात आला. फ्रिज मध्ये व्हक्सिंन, इंजेक्शन,व इतर लसी ठेवण्याची रुग्णालयात सोय झाली असल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ अंगद जाधव व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आर.आर.शेख यांनी यावेळी सांगितले , जैन समाजाच्या या सामाजिक उपक्रमाचे यावेळी सर्वांनी कौतुक केले, यावेळी भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष रमेश दुरुगकर सचिव नेमिनाथ विभूते,विजयकुमार पाटील,मनोज पाटील,आदित्य दुरुगकर,रितेश दुरुगकर, राजेंद्र दुरुगकर,कल्पना दुरुगकर यांच्या सह रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments